नागपूर : रामटेकमध्ये वंचितची माघार किशोर गजभिये यांना पाठिंबा

नागपूर : रामटेकमध्ये वंचितची माघार किशोर गजभिये यांना पाठिंबा

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : रामटेक लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शंकर चहांदे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. चहांदे यांनी माघार घेऊन याठिकाणी अपक्ष म्हणून रिंगणात असलेले आणि काँग्रेसतर्फे गेल्यावेळी लोकसभा निवडणूक लढलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिकेने लोकसभा मतदारसंघातील रंगात अधिकच वाढली आहे. पर्यायी उमेदवार म्हणूनही आपला विचार पक्षाने न केल्याचा संताप व्यक्त करीत गजभिये यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. पक्षाने आपल्यावर कारवाई केली तरी चालेल मात्र मी स्वतःहून पक्ष सोडणार नाही अशी कालपर्यंत भूमिका घेणारे गजभिये यांनी राजीनामा दिल्याने या मतदारसंघात त्रिकोणी मुकाबला रंगण्याची चिन्हे आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातून 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर रामटेकमध्ये आता 28 उमेदवार रिंगणात आहेत.उद्धव ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे, काँग्रेसचेच दर्शनी धवड,नरेश बर्वे यांनी अपक्ष म्हणून आपले अर्ज मागे घेतले.माजी मंत्री सुनील केदार गटाचे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी गेल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी आपला अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवल्याने, या बंडखोरीने महाविकास आघाडीची चिंता वाढविली आहे. रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रामुळे अर्ज बाद झाल्यास आपल्याला काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळावी अशी वारंवार मागणी केली मात्र मला संधी नाकारली गेली. हा अर्ज रद्द होऊ शकतो अशी पूर्वकल्पना हायकमांडला दिली पण लक्ष दिले नाही असा त्यांचा आरोप आहे.
Latest Marathi News नागपूर : रामटेकमध्ये वंचितची माघार किशोर गजभिये यांना पाठिंबा Brought to You By : Bharat Live News Media.