ईटीबीपीएस माध्यमातून होणार जिल्ह्यातील मतदान; काय आहे ईटीबीपीएस?

ईटीबीपीएस माध्यमातून होणार जिल्ह्यातील मतदान; काय आहे ईटीबीपीएस?

पुणे : Bharat Live News Media वृतसेवा : पुणे जिल्ह्यात लष्करी, निमलष्करी, केंद्रीय सशस्त्र पोलिस बल आदी सैन्यदलातील जवान मतदार आहेत. यंदाच्या निवडणुकीतही या जवानांना इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस) या संगणकीय प्रणालीद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये पाच हजार 145 पुरुष, तर 342 महिला अशा एकूण पाच हजार 487 जवानांचा समावेश आहे. सद्य:स्थितीला जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून जवान मतदारांची माहिती घेऊन नोंदणी करण्यात येत आहे. त्यानुसार अंतिम यादी तयार करून सीमेवरील मतदारांना ऑनलाइन यंत्रणेच्या माध्यमातून ई-मेलद्वारे मतपत्रिका पाठविण्यात येणार आहे.
जवानांनी मतपत्रिकेची छायांकित प्रत काढून मतदान करून लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे पोस्टाद्वारे पाठवायची आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे. त्यानुसार सीमेवर असणारे सैनिक असो किंवा तळागाळातील व्यक्ती सर्वांना सहज मतदान करता यावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जातात. पूर्वी सीमेवरील जवानांना मतदारयादी अंतिम झाल्यानंतर मतपत्रिका छापून सीमेवर पाठवल्या जात होत्या. या प्रक्रियेला 15 दिवसांचा कालावधी लागत असल्याने या प्रक्रियेला कालबाह्य करत आयोगाने ईटीबीपीएस प्रणालीचा अवलंब केला आहे. त्यानुसार मतपत्रिका ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल, अशी माहिती ईटीपीबीएस प्रणालीचे समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
असे होणार मतदान
मतदारसंघातील अंतिम उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर संबंधित मतपत्रिका डिजिटल पद्धतीने तयार करण्यात येतील. तत्पूर्वी सीमेवर असलेल्या जवानांना मतदानाचा हक्क बजावायचा आहे, याबाबत माहिती घेऊन अर्ज मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आदी अर्जात समाविष्ट करायचे आहे. त्यानंतर ज्या मतदारसंघात जवानांचे नाव समाविष्ट आहे, त्यानुसार मतपत्रिका जवानांना ई-मेलवर पाठविण्यात येईल. जवानांना मतपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी गुप्त क्रमांक (ओटीपी) मोबाईलवर प्राप्त झाल्यानंतर त्याची छायांकित प्रत काढावी लागले. त्यानंतर आवडत्या उमेदवाराला मतदान करून मतपत्रिका बंद पाकिटात समाविष्ट करून पोस्टाद्वारे मतदारसंघनिहाय निवडणूक अधिकार्‍याकडे पाठवावी लागणार आहे. या मतपत्रिकांची मतमोजणीवेळी सत्यता पडताळण्यासाठी त्यावरील बारकोड क्रमांक स्कॅनिंग करून मतमोजणी केली जाईल.
हेही वाचा

प्रेयसीला त्रास देणाऱ्या कामगाराचा खून करणार्‍याला जन्मठेप..!
रुग्णालय तयार; सुविधांची प्रतीक्षाच : लोहगाव रुग्णालयाची अवस्था
Pune : बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरल्यास होणार कारवाई

Latest Marathi News ईटीबीपीएस माध्यमातून होणार जिल्ह्यातील मतदान; काय आहे ईटीबीपीएस? Brought to You By : Bharat Live News Media.