सायलेन्स २ : मनोज बाजपेयी- प्राची देसाईचा चित्तथरारक सिनेमा

सायलेन्स २ : मनोज बाजपेयी- प्राची देसाईचा चित्तथरारक सिनेमा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘सायलेन्स’च्या बहु-प्रतीक्षित ट्रेलरच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. अबान भरूचा देवहंस या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी आणि प्राची देसाई सारखे कसलेले कलाकार; साहिल वैद, वकार शेख, दिनकर शर्मा आणि पारूल गुलाटी अशी दिमाखदार मंडळी झळकणार आहेत. झी स्टुडिओज आणि कॅन्डिड क्रिएशन्स निर्मित हा चित्रपट गूढ कहाणीने भरलेला आहे.
ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, मनोज वाजपेयी पुन्हा एकदा एसीपी अविनाश वर्मा नामक पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सायलेन्स २ : द नाईट आऊल बार शूटआऊट’ मध्ये, एसीपी अविनाश आणि त्याचे विशेष गुन्हे शाखा पथक हत्त्या मालिकेमागील रहस्ये उलगडण्यासाठी काळाच्या मागे धाव घेत असल्याचे दिसून येईल. सरतेशेवटी एका मोठ्या खुलाशामुळे प्रेक्षक चकित होतील. स्पेशल क्राईम युनिट या विकृत कथेचा पर्दाफार्श करेल की हे प्रकरण दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल? जर तुम्ही खुनाच्या गूढ कथांचे चाहते असाल, तर ‘सायलेन्स २: द नाईट आऊल बार शूटआउट’ हा सिनेमा तुम्ही पाहिलाच पाहिजे!

दिग्दर्शक अबान भरुचा देवहंस सांगतो की, ‘सायलेन्स २: द नाईट आऊल बार शूटआऊट’ चा ट्रेलर म्हणजे केवळ प्रेक्षकांना प्रतीक्षा असलेल्या मनोरंजक गूढ कथेची झलक आहे.
मनोज बाजपेयी सांगतो की, ‘सायलेन्स २: द नाईट आऊल बार शूटआऊट’ च्या निमित्ताने एसीपी अविनाश वर्माच्या भूमिकेत आणखी एका दिलखेच खुनाचे रहस्य पडद्यावर उलगडण्यासाठी मी खूप आनंदी आहे. या कलाकृतीच्या दुसऱ्या भागावर काम करण्याचा अनुभव आनंददायी होता आणि आमच्या प्रेक्षकांसाठी हा रोमांच दुप्पट करण्यासाठी मी उत्सुक आहे. प्राची, साहिल, वकार आणि पारुल यांच्यासह संपूर्ण कलाकारांनी त्यांचा जीव ओतला, ज्यामुळे निर्मितीचा प्रवास खरोखरच संस्मरणीय झाला. गेल्या वर्षी आम्ही चित्रीकरण सुरू केल्यापासून, चाहत्यांची अपेक्षा प्रचंड आहे.”

प्राची देसाई म्हणाली, “मनोज बाजपेयी हा एक प्रतिभावान अभिनेता असल्याने त्याच्यासोबत पुन्हा एकत्र काम करताना मला खूप छान वाटले. फ्रेंचायझीच्या दुसऱ्या भागासाठी पुन्हा एकदा संपूर्ण कलाकार मंडळींसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, ज्यासाठी मी उत्सुक होते.”
ती म्हणाली, “प्रेक्षकांना सिनेमा काय देईल याची झलक ट्रेलर देतो. थरार, गूढ आणि कथानकातील वळणे प्रेक्षकांना खिळवून ठेवतील आणि त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचेल”.
सायलेन्स २ : द नाईट आऊल बार शूटआऊट’चे स्ट्रीम १६ एप्रिलपासून ZEE5 वर होईल.
Latest Marathi News सायलेन्स २ : मनोज बाजपेयी- प्राची देसाईचा चित्तथरारक सिनेमा Brought to You By : Bharat Live News Media.