रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून युवकाचा मृत्यू

रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून युवकाचा मृत्यू

मानवत; Bharat Live News Media वृत्तसेवा : रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस धडकून मोटारसायकल चालक १८ वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२९) रात्री साडे सातच्या सुमारास मानवत ते नागरजवळा या रस्त्यावर घडली. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात रात्री १२:३० च्या सुमारास ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरील अपघात मानवत ते नागरजवळा रोडवर साहेबराव होगे यांच्या शेताजवळ झाला असून मयताचे नाव पांडुरंग बाळासाहेब होगे वय १८ असे आहे. तो बुधवारी रात्री साडे सातच्या सुमारास मोटारसायकल (क्रमांक एम एच २२ ए एच ६८७२ ) वरून नागरजवळा येथे घरी जात होता. ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर (क्रमांक एम एच २१ डी ३५६८) कोणतीही काळजी न घेता धोकादायक स्थितीत भर रस्त्यात उभा केला होता. याप्रकरणी मयत युवकाचा चुलतभाऊ विठ्ठल होगे (वय २४) याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.