नाशिक : अंबड मधील उड्डाणपुलावर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

नाशिक : अंबड मधील उड्डाणपुलावर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

सिडको; Bharat Live News Media वृत्तसेवा : भुजबळ फॉर्म जवळ उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बाळू धोंडू कुंभार्डे (वय 56 रा. गणेश चौक, सिडको) असे मृतच व्यक्तीचे नाव आहे.
मंगळवारी (दि. २६) रात्री साडेदहा अकरा वाजताच्या सुमारास भुजबळ फार्म जवळील उड्डाणपुलावरून बाळू धोंडू कुंभार्डे हा  दुचाकीवरून मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात होता. दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दुचाकी स्वरास तपासून मयत घोषित केले. फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.

Latest Marathi News नाशिक : अंबड मधील उड्डाणपुलावर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार Brought to You By : Bharat Live News Media.