सांगली: आगळगाव येथे भीषण अपघात; चिमकुलीसह ३ ऊस कामगार ठार

सांगली: आगळगाव येथे भीषण अपघात; चिमकुलीसह ३ ऊस कामगार ठार

कवठेमहांकाळ: Bharat Live News Media वृत्तसेवा:  रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगावाजवळ रस्त्याच्या कडेला नादुरूस्त  ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले. तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत.  हा अपघात आज (दि.२) पहाटे तीनच्या सुमारास घडला. मृत व जखमी हे मंगळवेढा तालुक्यातील ऊस तोडणी मजूर आहेत. जखमींना मिरज येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Sangli News
या अपघातात शालनताई दत्ता खांडेकर (वय ३५, रा. शिरवांदगी), लगमव्वा तम्माराया हेगडे (वय २०,  रा. चिक्कलगी), महादेव तम्माराया ऐवळे (वय १७, रा. चिक्कलगी), निलाबाई परशुराम ऐवळे (वय ३, रा. चिक्कलगी, ता. मंगळवेढा, जि.सोलापूर) हे चार जण जागीच ठार झाले. तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. Sangli News
गुरूदत्त साखर कारखाना टाकळी येथून ऊस तोडणी मजूर घेवून मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी गावाकडे ट्रॅक्टर (के. ए.28/ ए.बी.3569) जात होता. दरम्यान, बेल्ट बसविण्यासाठी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. चालक व मजूर बेल्ट बसवित होते. यावेळी मिरजेहून सांगोल्याकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने (ए.पी.39/ यु.एम.-5388) ट्रॅक्टरला  पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, ट्रॅक्टर सुमारे साठ ते सत्तर फूट फरफटत गेला. मृतांच्या अंगावरून ट्रक गेल्याने मृतांचे शरीर छिन्नविचिन्न झाले होते.
हेही वाचा 

सांगली, भिवंडीत मैत्रीपूर्ण लढत?
सांगली : खानापूर तालुक्यातील आळसंदचा तरुण चार जिल्ह्यातून तडीपार
Sangli Drugs Racket | परवीना भाभीच्या तस्करीमुळे सांगलीतील ड्रग्ज अड्ड्याचा पर्दाफाश 

Latest Marathi News सांगली: आगळगाव येथे भीषण अपघात; चिमकुलीसह ३ ऊस कामगार ठार Brought to You By : Bharat Live News Media.