हार्दिक पंड्याची ‘मुंबई इंडियन्‍स’वर पोस्‍ट, “या संघाबद्दल तुम्हाला…”

हार्दिक पंड्याची ‘मुंबई इंडियन्‍स’वर पोस्‍ट, “या संघाबद्दल तुम्हाला…”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2024) स्‍पर्धेतील सामन्‍यांबरोबरच मुंबई इंडियन्‍स संघाच्‍या कर्णधार बदलाची चर्चा अजुनही सुरु आहे. गुजरात संघाचा कर्णधार असणारा पंड्याकडे यंदा मुंबईचे नेतृत्त्‍वल सोपवले गेले. पंड्याने गुजरात संघाला 2022 मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते. तर २०२३ पर्यंत त्‍याच्‍या नेतृत्त्‍वाखाली गुजरात संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. अशातच या हंगामातील पहिल्‍या तिन्‍ही सामन्‍यात मुंबईच्‍या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाच्‍या मालिकेमुळे मुंबईचे चाहते निराश झाल्‍याचे सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून स्‍पष्‍ट होत आहेत. आता हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्‍स संघाबाबत आपल्‍या X  हॅण्‍डेल वर एका पोस्‍ट शेअर केली आहे. ( Hardik Pandya’s Post On Mumbai Indians Team )
आम्ही कधीही हार मानणार नाही. आम्ही लढत राहू…
हार्दिकने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “या संघाबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे, तर आम्ही कधीही हार मानणार नाही. आम्ही लढत राहू, आम्ही पुढे वाटचाल करत राहू.” ( Hardik Pandya’s Post On Mumbai Indians Team )

If there’s one thing you should know about this team, we never give up. We’ll keep fighting, we’ll keep going. pic.twitter.com/ClcPnkP0wZ
— hardik pandya (@hardikpandya7) April 2, 2024

राजस्‍थान विरुद्‍धच्‍या सामन्‍या पराभव झाल्‍यानंतर हार्दिक म्‍हणाला होता की, आपण बाद झाल्‍यानंतर राजस्थानच्या बाजूने खेळाचा समतोल ढासळला. सामन्‍यात आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात करायची होती तशी सुरुवात केली नाही. मला आणखी बरेच काही करायचे आहे. आम्ही बरेच चांगले करू शकतो, परंतु आम्हाला थोडे अधिक शिस्तबद्ध आणि दाखवण्याची गरज आहे. तीन पराभवांसह, मुंबई आयपीएल 2024 गुणतालिकेत तळाशी आहे.
हेही वाचा : 

IPL 2024 Schedule : आयपीएलच्या वेळापत्रकात मोठा बदल! ‘या’ सामन्यांच्या तारखा बदलल्या
IPL 2024, MI captaincy row : रोहित शर्मा पुन्‍हा मुंबईचा कर्णधार होईल : माजी क्रिकेटपटूचा दावा
IPL 2024-Virat Kohli : विराटचा वॉर्नरला ‘धोबीपछाड’,सलामीवीर म्‍हणून ‘या’ विक्रमाची नाेंद

Latest Marathi News हार्दिक पंड्याची ‘मुंबई इंडियन्‍स’वर पोस्‍ट, “या संघाबद्दल तुम्हाला…” Brought to You By : Bharat Live News Media.