कोल्‍हापूर : दानोळीत पती-पत्नीला मारहाण करून दीड तोळे सोने लंपास

कोल्‍हापूर : दानोळीत पती-पत्नीला मारहाण करून दीड तोळे सोने लंपास

दानोळी : Bharat Live News Media वृत्तसेवा येथील उमळवाड रोड वरील पहिला ओढा परिसरात शेतात वस्तीला असणाऱ्या पती-पत्नीला मारहाण करून अंदाजे दीड तोळे सोने लंपास केल्‍याची घटना समोर आली आहे. ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, येथील मारूती मल्हारी कारंडे यांचे उमळवाड रोड वरील पहिला ओढा परिसरात जनावरांचा गोठा वजा शेड आहे. दररोज रात्री मारूती व पत्नी प्रतिभा हे शेतावर वस्तीला असतात. आज ही ते वस्तीला गेले होते. यावेळी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी दारावर बाहेरून लात घा लून तीन हल्लेखोरांनी आत प्रवेश केला. दोघा पती पत्नीला बेदम मारहाण केली व दोघांच्या गळ्याला कोयता लाऊन प्रतिभा यांच्या गळ्यातील डोरले, पैजण, जोडवी, कानातील वेल फुले असा अंदाजे दीड तोळ्यांचे ऐवज व मारूती यांचा मोबाईल व गाडीची किल्ली घेऊन चोरटे पसार झाले.
जाताना चोरट्यांनी दोघा पती, पत्नीला एका खोलीत कोंडून बाहेरून कडी लावली होती. ही माहिती गावात कळताच यात्रा कमिटीने भेट देऊन माहिती घेतली. पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. तर कारंडे पती, पत्नीवर दानोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : 

शिवरायांच्या कवड्यांचा आता जगात डंका; मिळालं जीआय मानांकन                                 
काळजी घ्या ! राज्यात वाढणार उष्णतेची लाट; ‘हा’ भाग असेल अधिक उष्ण 
Lok Sabha Election 2024 : महायुती ५ तर मविआचे १३ जागांवर अडले घोडे! 

Latest Marathi News कोल्‍हापूर : दानोळीत पती-पत्नीला मारहाण करून दीड तोळे सोने लंपास Brought to You By : Bharat Live News Media.