उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; सुसाट डंपरने रिक्षाला उडवले, ५ जणांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; सुसाट डंपरने रिक्षाला उडवले, ५ जणांचा जागीच मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यात कापसेठी-अमनपूर राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.२) पहाटे भीषण अपघात झाला. एका सुसाट डंपरने ओव्हरटेक करणाऱ्या ऑटोरिक्षाला उडवले. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (UP Accident)
कारवी कोतवाली परिसरातील अमनपूर गावात पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. चित्रकूट धाम कारवी रेल्वे स्थानकावरून प्रवाशी घेऊन रिक्षा रामघाटकडे जात होता. त्यात नऊ जण होते. अमानपूरला ऑटो आल्यानंतर पुढे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत होता. त्याचवेळी भरतकुपकडून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. ऑटोमधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही. अपघातानंतर चालक डंपर सोडून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. (UP Accident)
हेही वाचा : 

दु्र्दैवी ! मुलीचा लग्न सोहळा संपन्न झाला अन् बाप नंतर अपघाती गेला..
Jammu News | जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात, टॅक्सी दरीत कोसळून १० ठार
IndiGo-Air India Plane Accident: इंडिगो-एअर इंडियाच्या विमानांचा अपघात, सुदैवाने मोठी हानी टळली

Latest Marathi News उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; सुसाट डंपरने रिक्षाला उडवले, ५ जणांचा जागीच मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.