Weather Update : पुणेकरांनो काळजी घ्या! शहराचा पारा 40 अंशांवर..

Weather Update : पुणेकरांनो काळजी घ्या! शहराचा पारा 40 अंशांवर..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सोमवारी दिवसभर पुणेकर असह्य उकाड्याने हैराण झाले. शहरातील कोरेगाव व लवळे या भागांचा पारा 40 अंशांवर गेला होता. दुपारी आकाश किंचित ढगाळ असल्याने उष्मा जास्तच जाणवत होता.शहराच्या कमाल व किमान तापमानात मोठे बदल झाले असून शहराचे सरासरी कमाल तापमान सोमवारी 25 मार्च रोजी 38 अंशांवर पोहोचले. सकाळी 10 ते दुपारी 3.30 पर्यंत उष्मा जास्त जाणवत होता. त्यामुळे या वेळेत काम असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा सुती कपडे घालावे, सतत पाणी, सरबत, ताक घ्यावे, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा

पुणेकरांचा हवाई प्रवास सुसाट! दुबई, सिंगापूरचा चकरा वाढल्या..
सावधान ! आक्षेपार्ह पोस्ट पडतील महागात; प्रशासनाचा मोठा निर्णय
असेही भाडेकरु! शासकीय कार्यालयांकडे महापालिकेचे कोटींचे भाडे थकीत..

Latest Marathi News Weather Update : पुणेकरांनो काळजी घ्या! शहराचा पारा 40 अंशांवर.. Brought to You By : Bharat Live News Media.