आज भारत न्यूझीलंडशी भिडणार; १२ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य

आज भारत न्यूझीलंडशी भिडणार; १२ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना आज (दि.१५) होणार आहे. या सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी २०१९ मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि १२ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य ठेवून टीम इंडिया मैदानात उतरेल. २०११ नंतर फायनल गाठण्याकडे भारतीयांचे डोळे लागले आहेत.
भारताने सर्व नऊ सामने जिंकले
या विश्वचषकात भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारताने साखळी टप्प्यातील सर्व नऊ सामने जिंकले आणि अपराजित राहून उपांत्य फेरीत प्रवेश केला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ केवळ दोन सामन्यांमध्ये बदलांसह दाखल झाला आहे. पहिल्या सामन्यात खेळलेल्या अश्विनच्या जागी शार्दुलला दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली आणि चौथ्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाल्यानंतर शार्दुलच्या जागी मोहम्मद शमीचा आणि हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला होता.
संभावित भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
संभावित न्यूझीलंड संघ : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन.
The post आज भारत न्यूझीलंडशी भिडणार; १२ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना आज (दि.१५) होणार आहे. या सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी २०१९ मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आणि १२ वर्षांनंतर अंतिम …

The post आज भारत न्यूझीलंडशी भिडणार; १२ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्याचे लक्ष्य appeared first on पुढारी.

Go to Source