देशात अब्जाधीशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ

देशात अब्जाधीशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील अतिश्रीमंत अशा अब्जाधीशांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षांत हजारो कोटींची संपत्ती असलेल्या श्रीमंतांच्या संख्येत 75 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या भारतात अशा अब्जाधीशांची संख्या 1,300 हून अधिक झाली आहे. हुरून इंडियाच्या एका अहवालात याची माहिती देण्यात आली आहे.
हजारो कोटी संपत्तीधारकांच्या यादीत वाढ
हुरून इंडिया रिच लिस्टनुसार, सध्या भारतात 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची संख्या 1,319 झाली आहे. हुरून इंडिया रिच लिस्ट 2023 नुसार, श्रीमंत लोकांच्या या क्लबमध्ये 278 नवीन लोक सामील झाले आहेत. भारतात 1,000 कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या लोकांची संख्या 1,300 च्या पुढे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या पाच वर्षांत भारतात अशा लोकांची संख्या 75 टक्क्यांनी वाढली आहे. या अहवालात म्हटल्यानुसार, भारत आणि चीन देशांच्या श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांमध्ये फरक आहे. भारताच्या बाबतीत कुटुंबावर आधारित रचना आहे, ज्यांचे व्यवसाय साम्राज्य पिढ्यान्पिढ्या चालत आले आहेत. चीनमध्ये बहु-पिढीच्या बिझनेस हाऊसची कमतरता आहे.
Latest Marathi News देशात अब्जाधीशांच्या संख्येमध्ये मोठी वाढ Brought to You By : Bharat Live News Media.