कोलकातामधून धावणार अंडरवॉटर मेट्रो रेल्वे

कोलकातामधून धावणार अंडरवॉटर मेट्रो रेल्वे

कोलकाता; वृत्तसंस्था : कोलकातातील उत्तर-दक्षिण कॉरिडॉरवरून (ब्लू लाईन) 1984 मध्ये देशातील पहिली मेट्रो रेल्वे धावली. आता सुमारे 23 वर्षांनंतर इतिहासात पुन्हा कोलकातामध्ये इतिहास घडणार असून देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे 31 डिसेंबर रोजी येथून धावणार आहे. जमिनीपासून 33 मीटर आणि हुगळी नदीच्या पृष्ठभागाच्या 13 मीटर खाली 520 मीटर लांबीच्या बोगद्यात दोन ट्रॅक टाकले आहेत.
हावडा ते महाकरण स्थानक असा 520 मीटर लांबीचा प्रवास मेट्रो रेल्वे एका बोगद्याद्वारे पूर्ण करणार आहे. रेल्वे ताशी 80 किमी या वेगाने धावणार असून केवळ 45 सेकंदांतच रेल्वे बोगदा पार करेल. या बोगद्याद्वारे हावडा थेट कोलकात्याशी जोडला जाणार असून रोज 7 ते 10 लाख लोकांचा प्रवास सुकर होणार आहे. रेल्वेची 21 एप्रिल रोजी चाचणी घेतली होती. प्रकल्प आणि नियोजनचे संचालक सय्यद मोहम्मद आणि कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे जमील हसन यांनी सांगितले की, 2010 मध्ये बोगदा बांधण्याचे कंत्राट अफकॉन्स कंपनीला दिले होते.
अफकॉन्सने जर्मन कंपनी हेरेनकनेक्टकडून सेल बोअरिंग मशिन प्राप्त केली आणि अफकॉन्सच्या एका कर्मचार्‍याच्या मुलींच्या नावावरून या मशिनची नावे प्रेरणा आणि रचना ठेवली आहेत. सध्या अंडरवॉटर मेट्रो रेल्वे केवळ लंडन आणि पॅरिसमध्ये धावते.
5 ते 6 महिने सर्वेक्षण
खोदण्यासाठी योग्य मातीची निवड करणे आणि कोलकातामध्ये दर 50 मीटरवर सेल बोअरिंग मशिन सुरक्षितता ही दोन मोठी आव्हाने प्रकल्पासमोर होती. विविध प्रकारची माती वेगवेगळ्या अंतरावर आढळते. बोगद्यासाठी योग्य जागा मिळवण्यासाठी 5 ते 6 महिने सर्वेक्षण केले.
The post कोलकातामधून धावणार अंडरवॉटर मेट्रो रेल्वे appeared first on पुढारी.

कोलकाता; वृत्तसंस्था : कोलकातातील उत्तर-दक्षिण कॉरिडॉरवरून (ब्लू लाईन) 1984 मध्ये देशातील पहिली मेट्रो रेल्वे धावली. आता सुमारे 23 वर्षांनंतर इतिहासात पुन्हा कोलकातामध्ये इतिहास घडणार असून देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे 31 डिसेंबर रोजी येथून धावणार आहे. जमिनीपासून 33 मीटर आणि हुगळी नदीच्या पृष्ठभागाच्या 13 मीटर खाली 520 मीटर लांबीच्या बोगद्यात दोन ट्रॅक टाकले आहेत. हावडा …

The post कोलकातामधून धावणार अंडरवॉटर मेट्रो रेल्वे appeared first on पुढारी.

Go to Source