हैदराबादमध्ये गोदामाला आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू

हैदराबादमध्ये गोदामाला आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन : हैदराबादच्या नामपल्ली येथील बाजारघाट येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, अशी माहिती सेंट्रल झोन विभागाचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी दिली आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु आहे. कार दुरुस्त करताना ठिणगी उडाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेत ३ जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर केमिकल ठेवण्यात आले होते. गाडी दुरुस्त करत असताना ठिणगी पडल्याने ही आग लागल्याचे समजते. सकाळी ९.३५ च्या सुमारास अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.
पाच मजली इमारतीत मेकॅनिकल दुकान असून तळमजल्यावर केमिकलचे गोदाम होते. या गोदामात आग लागली आहे.
हैदराबादमधील आणखी एका आगीच्या घटनेत रविवारी जुन्या शहरातील मीर चौक पोलिस स्थानक हद्दीतील एका इमारतीमध्ये चप्पल असलेल्या पाच गोदामांना भीषण आग लागली होती.

#WATCH | Six people have died in a fire at a godown located in an apartment complex in Bazarghat, Nampally of Hyderabad, says DCP Venkateshwar Rao Central Zone. pic.twitter.com/sXepmTPB2f
— ANI (@ANI) November 13, 2023

The post हैदराबादमध्ये गोदामाला आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : हैदराबादच्या नामपल्ली येथील बाजारघाट येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील केमिकल गोदामाला लागलेल्या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, अशी माहिती सेंट्रल झोन विभागाचे डीसीपी व्यंकटेश्वर राव यांनी दिली आहे. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरु आहे. कार दुरुस्त करताना ठिणगी उडाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत ३ जण जखमी झाले …

The post हैदराबादमध्ये गोदामाला आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source