नंदुरबार : मुलींची छेड काढणाऱ्या १७ टवाळखोरांना पोलिसांचा दणका

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : नंदुरबार पोलिसांनी मुलींची छेड काढणाऱ्या 17 जणांवर गुन्हे दाखल करीत टवाळखोरांना दणका दिला . दरम्यान मोटरसायकलचे सायलेन्सर मोठ्या आवाजात वाजवणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात शिवीगाळ करणे. तसेच छेड काढणे, असे प्रकार करणाऱ्या विरोधात डायल 112 वर संपर्क करून माहिती द्यावी, पोलिसांकडून त्वरित कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक पी. … The post नंदुरबार : मुलींची छेड काढणाऱ्या १७ टवाळखोरांना पोलिसांचा दणका appeared first on पुढारी.

नंदुरबार : मुलींची छेड काढणाऱ्या १७ टवाळखोरांना पोलिसांचा दणका

नंदुरबार, Bharat Live News Media वृत्तसेवा : नंदुरबार पोलिसांनी मुलींची छेड काढणाऱ्या 17 जणांवर गुन्हे दाखल करीत टवाळखोरांना दणका दिला . दरम्यान मोटरसायकलचे सायलेन्सर मोठ्या आवाजात वाजवणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात शिवीगाळ करणे. तसेच छेड काढणे, असे प्रकार करणाऱ्या विरोधात डायल 112 वर संपर्क करून माहिती द्यावी, पोलिसांकडून त्वरित कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे. Nandurbar Police
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुध्द पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांचे एक पथक तयार करुन टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद् कारवाई करण्याबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. Nandurbar Police
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातनंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील नेहरु चौक, डी.आर. हायस्कूल परिसरात-08, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील उड्डानपुल, सिंधी कॉलनी परिसरात- 05, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-02, विसरवाडी पोलीस ठाणे-02 असे एकुण 17 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्येटवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना तसेच नागरिकांना त्रास देणाऱ्या टवाळखोर युवकांना संबंधित पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्ये करण्यापासून परावृत्त करावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढणारे व रात्रीच्यावेळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांच्या मागून येत दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज करणारे, शिवीगाळ करणाऱ्याची माहिती तात्काळ डायल-112 वर द्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा 

नंदुरबारमध्ये अवैध मद्य साठा पकडणाऱ्या मुंबईतील पथकावर दगडफेक

महाराष्ट्रात प्रथमच नंदुरबारला सिकलसेल तपासणी यंत्र झाले प्राप्त

नंदुरबारला अवकाळीचा फटका, नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश

The post नंदुरबार : मुलींची छेड काढणाऱ्या १७ टवाळखोरांना पोलिसांचा दणका appeared first on Bharat Live News Media.

Go to Source