न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच करणीबाधेचा प्रकार

न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच करणीबाधेचा प्रकार

बेळगाव : करणीबाधा करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोमवारी तर जेएमएफसी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोरच करणीबाधेचा प्रकार आढळून आला आहे. यामुळे वकील वर्गाबरोबरच पक्षकारांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नारळ, गुलाल आणि इतर साहित्य त्याठिकाणी ठेवण्यात आले होते. दिवसभर हे करणीबाधेचे साहित्य पडून होते. याबद्दल न्यायालयाच्या आवारात जोरदार चर्चा सुरू होती. शहर असो किंवा ग्रामीण भाग असो, विविध चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेतून करणीबाधेचे प्रकार आढळून येत आहेत. ज्या ठिकाणी अनेक रस्ते जोडले जातात, त्या ठिकाणी हमखास उतारा टाकला जात आहे. सोमवारी तर जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात करणीबाधेचे साहित्य आढळून आले. खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून अंधश्ा़dरद्धेतून ही करणीबाधा केल्याची चर्चा रंगली होती. 21 व्या शतकात वावरताना अजूनही जनता अंधश्रद्धेमध्ये गुरफटून गेली आहे. यापूर्वीही न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर, तसेच सरकारी वकिलांच्या कार्यालयासमोर अशाच प्रकारच्या मोठ्या प्रमाणात करणीबाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आता पुन्हा असे प्रकार वाढले आहेत. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.