अखेर ‘त्या’ फलकावरील मजकूर हटविला

अखेर ‘त्या’ फलकावरील मजकूर हटविला

बेळगाव : खडेबाजार येथील दरबार गल्ली परिसरात फलकाची उभारणी करण्यात आली होती. या फलकावर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे काही जणांनी तक्रार केली होती. त्यानंतर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. तो फलक हटविण्याबाबत सूचना करण्यात आल्या. मात्र त्या फलकावरील आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यात आला. महानगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. सध्या रमजान-ईदच्या तयारीमध्ये मुस्लीम बांधव गुंतले आहेत. त्याबाबतचे फलक या परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे त्या फलकावरील तो उल्लेख काढावा, अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार तो मजकूर हटविण्यात आल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे.