विदेशी चलन साठ्यात 2.4 अब्ज डॉलरची घसरण

विदेशी चलन साठ्यात 2.4 अब्ज डॉलरची घसरण

नवी दिल्ली :
26 एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 2.412 अब्ज डॉलरची घट पहायला मिळाली आहे. अशा रितीने देशाचा विदेशी चलन साठा सदरच्या आठवड्यामध्ये 637.922 अब्ज डॉलरवर राहिला होता. तिसऱ्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठ्यामध्ये घसरण झालेली पहायला मिळाली आहे. या अगोदरच्या सलग 7 आठवड्यामध्ये भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये वाढच होत राहिली होती. याचबरोबर देशाच्या सुवर्ण साठ्यामध्येसुद्धा घसरण अनुभवायला मिळाली आहे. देशाचा सुवर्ण साठा 157 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 55.533 अब्ज डॉलरवर राहिला आहे.