गोदरेज प्रॉपर्टीज प्रकल्पांसाठी करणार 30 हजार कोटी खर्च

गोदरेज प्रॉपर्टीज प्रकल्पांसाठी करणार 30 हजार कोटी खर्च

बेंगळूर:
बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज यांनी आगामी काळामध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये 30 हजार कोटी रुपयांचे गृहबांधणी प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. वरीलप्रमाणे रक्कम रहिवासी बांधकाम प्रकल्पांसाठी खर्चली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये सदरचे प्रकल्प आकाराला येतील असे कंपनीने स्पष्ट केले आहे. महत्त्वाच्या शहरांमधून ग्राहकांचा प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळत असून घर खरेदी बुकिंगच्या माध्यमातून 20 टक्के इतकी वाढ दिसून आली आहे.
27 हजार कोटी मिळण्याची आशा
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 27 हजार कोटी रुपये बुकिंगच्या माध्यमातून कंपनी प्राप्त करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मागच्या आर्थिक वर्षामध्ये घरांच्या बुकिंगच्या माध्यमातून 22 हजार 527 कोटी रुपये गोदरेज प्रॉपर्टीजने प्राप्त केले होते. मागच्या आर्थिक वर्षातील घरांची विक्री विक्रमी स्तरावर राहिली असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.