व्हीआयची नोकिया-एरिक्सनसोबत बोलणी सुरु

व्हीआयची नोकिया-एरिक्सनसोबत बोलणी सुरु

नवी दिल्ली :
दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया (व्हीआय) 4 जी नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी नोकिया आणि एरिक्सन या युरोपियन विक्रेत्यांशी चर्चा करत आहे. एका अहवालामधून याबाबत माहिती दिली आहे. अहवालानुसार, फॉलो-ऑन सार्वजनिक ऑफर म्हणजेच 18,000 कोटींच्या एफपीओनंतर चर्चेला वेग आला आहे.
4 जी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी कंपनी सुमारे 13,000 कोटी खर्च करू शकते. निवडणुकीनंतर कंपनी जून-जुलैमध्ये खरेदीची ऑर्डर देऊ शकते. व्होडाफोन-आयडिया 25,000 कोटी उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
एफपीओद्वारे निधी उभारण्याव्यतिरिक्त, दूरसंचार कंपनी कर्जाद्वारे 25,000 कोटी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने प्रमोटर युनिटकडून प्राधान्य शेअर इश्यूद्वारे 2,075 कोटी उभारण्यास आधीच मान्यता दिली होती.
4 नेटवर्क अपग्रेड करावे लागेल
रिपोर्टनुसार, 5जी लाँच करण्यापूर्वी व्हीआयला 4 नेटवर्क अपग्रेड करावे लागेल. एका अधिकाऱ्याने सांगितले की व्होडाफोन आयडियाच्या 4जी नेटवर्कमध्ये चिनी विक्रेत्यांचा मोठा हिस्सा आहे, परंतु चीनी फर्मला 5जी नेटवर्कसाठी परवानगी नाही. त्यामुळे, टेलिकॉम कंपनीला प्रथम युरोपियन विक्रेत्यांमार्फत 4जी नेटवर्क अपग्रेड करावे लागेल आणि नंतर 5जी रोलआउटची योजना करावी लागेल. व्होडाफोन आयडियावर 210000 कोटी रुपयांचे कर्ज आहे.