कळसुलकर हायस्कूलमधून वेदिका ताटे प्रथम

सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी कळसुलकर हायस्कूलचा निकाल 96.5 टक्के लागला आहे. कळसुलकर हायस्कूलमध्ये 76 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 73 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वेदिका संजय ताटे 98 .40 टक्के गुण मिळवून कळसुलकर हायस्कूल मध्ये प्रथम आली तर यज्ञेश यशवंत सावंत 98 टक्के गुण मिळवून द्वितीय तर विठ्ठल राजेश गुडेकर 97.20% गुण मिळवून तृतीय आला. यशस्वी […]

कळसुलकर हायस्कूलमधून वेदिका ताटे प्रथम

सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी कळसुलकर हायस्कूलचा निकाल 96.5 टक्के लागला आहे. कळसुलकर हायस्कूलमध्ये 76 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 73 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वेदिका संजय ताटे 98 .40 टक्के गुण मिळवून कळसुलकर हायस्कूल मध्ये प्रथम आली तर यज्ञेश यशवंत सावंत 98 टक्के गुण मिळवून द्वितीय तर विठ्ठल राजेश गुडेकर 97.20% गुण मिळवून तृतीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शैलेश पै, मुख्याध्यापक नारायण मानकर, संस्थेचे संचालक शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.