रशिया-युक्रेनकडून युद्धकैद्यांची देव-घेव

रशिया-युक्रेनकडून युद्धकैद्यांची देव-घेव

युद्धादरम्यान पकडलेल्या प्रत्येकी 75 सैनिकांची वापसी
वृत्तसंस्था/ कीव
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असून सध्या तरी ते संपण्याची चिन्हे नाहीत. याचदरम्यान, युक्रेन आणि रशियाने शुक्रवारी युद्धात पकडलेल्या एकमेकांच्या 75-75 सैनिकांची देवाणघेवाण केली. गेल्या तीन महिन्यात प्रथमच दोन्ही देशांदरम्यान युद्धकैद्यांची (पीओडब्ल्यू) देवाण-घेवाण झाली आहे. युनायटेड अरब अमिरातीने या मुद्यावर महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे समजते. युक्रेन कोऑर्डिनेशन हेडक्वार्टर फॉर ट्रीटमेंट ऑफ पीओडब्ल्यूनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून एकूण 3,210 युव्रेनचे लष्करी कर्मचारी आणि नागरिक देशात परतले आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू असताना काही प्रमाणात शांततेसाठी प्रयत्न केले जात असले तरी हल्ल्याचे प्रयत्नही सुरूच आहेत. युक्रेनला दोन वर्षांहून अधिक काळ रशियाकडून मोठ्या प्रमाणावर आक्रमणाचा सामना करावा लागला. युक्रेनमधील ईशान्येकडील खार्किव शहरात रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान पाच जण ठार तर 24 हून अधिक जखमी झाल्याचे खार्किवचे गव्हर्नर ओलेह सिनिहुबोव्ह यांनी सांगितले. रशियन सैन्याने शहरावर पाच क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात किमान 20 निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये किमान 5 जणांना जीव गमवावा लागला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले बहुतांश लोक पाच मजली अपार्टमेंटमध्ये राहत होते. या हल्ल्यात अग्निशमन इंजिन आणि ऊग्णवाहिकेचेही नुकसान झाले आहे. कीववर क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कार दुऊस्तीचे दुकान आणि सहा वाहनांचे नुकसान झाले.
अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्रे वापरासाठी अनुमती
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला दिलेली शस्त्रे रशियन लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. तथापि, ही शस्त्रे रशियन हद्दीत वापरली जाऊ नयेत, असे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत, युक्रेनला रशियाविऊद्धच्या हल्ल्यांमध्ये पाश्चात्य देशांनी पुरवलेली शस्त्रे वापरण्यास मनाई होती