पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना पूर्ण

पंतप्रधान मोदींची ध्यानसाधना पूर्ण

कन्याकुमारीमध्ये 45 तास ध्यान : विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये 3 दिवस मुक्काम
वृत्तसंस्था/ चेन्नई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन दिवसीय ध्यानधारणा पूर्ण झाली आहे.  कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये गेल्या 45 तासांपासून ध्यान करत होते. ते तीन दिवस ध्यानमंडपममध्ये त्यांनी मुक्काम केला. त्यांनी शनिवारी तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ‘सूर्य अर्घ्य’ अर्पण केली. पंतप्रधानांनी समुद्रात सूर्याला जल अर्पण केल्यानंतर रुद्राक्षांची जपमाळ हाती घेत जप केला. यावेळी त्यांनी भगवे कपडे घातले होते. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 45 तासांचे ध्यान पूर्ण झाले आहे. पंतप्रधान मोदींनी गुऊवारी सायंकाळपासून देशाच्या दक्षिणेकडील टोकावर असलेल्या कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल येथे 45 तासांच्या ध्यानधारणेला सुऊवात केली होती. पंजाबमधील होशियारपूर येथे निवडणूक सभेला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने थेट कन्याकुमारी येथे पोहोचले. येथे त्यांनी भगवती अम्मान मंदिरात प्रार्थना केल्यानंतर ते बोटीमध्ये बसून समुद्रकिनाऱ्यापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या एका खडकावर असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पोहोचले. येथे त्यांनी 45 तासांचे ध्यान सुरू केल्यानंतर त्यांची ध्यानधारणा शनिवारी पूर्ण झाली असून आता ते दिल्लीला परतले आहेत.

ध्यानधारणेच्या मुद्यावर विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी टीका करताना कोणीही तिथे जाऊन ध्यान करू शकतो. पण ध्यान करताना एखादा पॅमेरामन घेऊन जाऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला होता. तर अखिलेश यादव यांनी सध्या ध्यानधारणेची गरजच काय? असे म्हटले होते. तसेच काँग्रेस नेते दानिश अली यांनी निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना त्याचे थेट प्रक्षेपण करण्यावर बंदी घालावी असे म्हटले होते. तसेच तामिळनाडू काँग्रेसने या मुद्यावर न्यायालयात याचिका दाखल केली आहे.