द पेंग्विन’चा ट्रेलर सादर

द पेंग्विन’चा ट्रेलर सादर

कॉलिन फैरेल मुख्य भूमिकेत
मॅट रीव्सची द बॅटमॅन स्पिनर ऑफ सीरिज ‘द पेंग्विन’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. कॉलिन फैरेल अॅक्शन सीरिजमध्ये नाइट क्लब मालकाच्या स्वरुपात स्वत:च्या भूमिकेत परतणार आहे. याचा ट्रेलर ओसवाल्ड ‘पेंग्विन’ कोबलपॉटवर नजर टाकतो, जो सीरिजमध्ये सूड घेताना दिसून येणार आहे.
कॉलिन फॅरेल स्वत:च्या खलनायकाच्या अवतारात पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. याचा ट्रेलर विस्फोटांसोबत अॅक्शनदृश्यांनी भरलेला आहे. परंतु या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु ही सीरिज चालू वर्षाच्या अखेरपर्यंत प्रदर्शित होणार असल्याचे मानले जात आहे. द पेंग्विनच्या कलाकारांमध्ये सोफिया फाल्कोनच्या रुपात क्रिस्टिन मिलियोटी, साल्वाटोर मारोनीच्या रुपात क्लेंसी ब्राउन, अल्बर्टो फाल्फोनच्या रुपात मायकल जेगेन आणि जॉनी विट्टीच्या भूमिकेत मायकल केली दिसून येणार आहे. अन्य कलाकारांसंबंधी अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.