मतमोजणी दिनी शहरात कडक बंदोबस्त

मतमोजणी दिनी शहरात कडक बंदोबस्त

पोलीस आयुक्तांची माहिती :300 सीसीटीव्ही कॅमेरे, 5 केएसआरपी तुकड्यांची नियुक्ती
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतीच अनुचित घटना घडू नये, यादृष्टीने कडक पोलीस बंदोबस्त व सुरक्षाव्यवस्था ठेवण्याचे नियोजन केले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह केएसआरपीच्या 5 तुकड्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरपीडी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्रातील स्ट्राँगरुमला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. दि. 4 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली जाणार आहे. यासाठी शहरातील संवेदनशील भागासह अतिसंवेदनशील भागामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांची ठिकठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे यांचीही मदत घेतली जाणार आहे. संवेदनशील भागाचे सर्वेक्षण करण्यात आले असून आवश्यक ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरामध्ये 300 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे यासह पोलिसांची नियुक्ती केली जाणार आहे.त्यांच्या मदतीला ड्रोन कॅमेरेही उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. मतमोजणी केंद्राच्या आवारामध्येही चोख बंदोबस्त ठेवला जाणार असून पोलीस अधिकाऱ्यांसह केएसआरपी तुकड्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये व केंद्राच्या बाहेर केएसआरपी जवानांची नियुक्ती केली जाणार आहे. 13 पोलीस निरीक्षक, दोन डीसीपी, 400 पोलीस कर्मचारी, 300 होमगार्ड अशाप्रकारे पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे आयुक्त यडा मार्टिन यांनी सांगितले. कोणत्याच प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सजग ठेवणार असल्याचे सांगून यापूर्वी घडलेल्या घटना पुन्हा घडणार नाहीत, याची दखल घेतली जाईल,