वायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाइन सुरू

वायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाइन सुरू

वायू प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने (TMC) विविध उपाययोजना राबवल्या आहेत. यासोबतच ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार वायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाइन (8657887101) सुरू करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील वायू प्रदूषणाबाबत नागरिकांनी 8657887101 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

कचरा जाळणे, बांधकामादरम्यान परिसरात होणारी धूळ, बांधकाम कचरा/डेब्रिज, (सी आणि डी वेस्ट) रस्त्यांवरील वाहतूक, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे प्रदूषण, बांधकामाच्या कचऱ्याचे डंपिंग, वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग आदी तक्रारी फोटोसह व्हॉट्सअॅपद्वारे नोंदवल्या जाऊ शकतात.ठाणे महापालिका प्रशासन तक्रारीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करेल. त्यात दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. फटाक्यांबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे कारवाईसाठी पाठवल्या जातील.
हेही वाचादहिसरमध्ये मॅनग्रोव्ह पार्क आणि इको-टूरिझम सेंटर सुरू होणारमुंबईत प्रवेश करण्यापूर्वी वाहनांची चाके धुतली जाणार

वायू प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने (TMC) विविध उपाययोजना राबवल्या आहेत. यासोबतच ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार वायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाइन (8657887101) सुरू करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील वायू प्रदूषणाबाबत नागरिकांनी 8657887101 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

कचरा जाळणे, बांधकामादरम्यान परिसरात होणारी धूळ, बांधकाम कचरा/डेब्रिज, (सी आणि डी वेस्ट) रस्त्यांवरील वाहतूक, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे प्रदूषण, बांधकामाच्या कचऱ्याचे डंपिंग, वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग आदी तक्रारी फोटोसह व्हॉट्सअॅपद्वारे नोंदवल्या जाऊ शकतात.

ठाणे महापालिका प्रशासन तक्रारीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई करेल. त्यात दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. फटाक्यांबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे कारवाईसाठी पाठवल्या जातील.

हेही वाचा

दहिसरमध्ये मॅनग्रोव्ह पार्क आणि इको-टूरिझम सेंटर सुरू होणार

मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी वाहनांची चाके धुतली जाणार

Go to Source