धाराशिव: परंडा येथे रात्री दोन वाजता जरांगे-पाटलांची सभा : महिलांची मोठी गर्दी

धाराशिव: परंडा येथे रात्री दोन वाजता जरांगे-पाटलांची सभा : महिलांची मोठी गर्दी

परंडा, पुढारी वृत्तसेवा : सभेला यायला उशीर होतोय, परंतु ठिकठिकाणी मराठा बांधव पाहिल्यानंतर वाटेत थांबावं लागतंय. त्यांना डावलून जाऊ शकत नाही. रात्रीचे २ वाजले असतानाही आपण सर्व विशेषतः महिला सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आरक्षण किती महत्वाचे आहे, हे यावरून तुमच्या लक्षात आल्याचे दिसते. मराठा आरक्षण ७० वर्ष थोपवून ठेवलंय. आपल्या लेकरांनी अन्याय सहन केलाय. आता सुट्टी नाही, काय करायचं ते करा, पण आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.१६) येथे बोलून दाखवला. Manoj Jarange-Patil
परंडा शहरातील पंचायत समिती मैदानावर जरांगे – पाटील यांची भव्य सभा रात्री १ : ३० वाजता सुरु झाली. सभेची वेळ बुधवारी (दि.१४) सायंकाळी ४ : ३० वाजता होती. परंतु, सभा तब्बल ११ तास उशिराने सुरू झाली. तरीही मराठा समाज मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित होता. Manoj Jarange-Patil
१८०५ ,१९६७ ते २०२३ पर्यंतचे आता आपल्याला कुणबीचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे २४ डिसेंबर हा सुवर्ण दिवस उगवणार व ओबीसी तथा ५० टक्केच्या आतील आरक्षण मराठा समाजाला मिळणार असल्याचा विश्वास जरांगे- पाटील यांनी परंडा (जि. धाराशिव) येथील विराट सभेत मराठा बांधवांना दिला.
यावेळी जरांगे-पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला. जेसीबी मशिनद्वारे पुष्पवृष्टी, फटाके फोडून शहरात, सभेस्थळी व मार्गावर ठिकठिकाणी जरांगे- पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
जरांगे- पाटील म्हणाले की, आमच्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तरी आम्ही घाबरणार नाही. आमचे आंदोलन शांततेने, लोकशाही मार्गाने सुरुच रहाणार आहे. काही नेते खोट्या केसेस करायला लागले आहेत. पण त्यांची गाठ आरक्षण मिळाल्यावर आपल्याच बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर या मराठ्यांनी आयुष्यभर गुलाल लागू दिला आहे. आता सरकार तुमच्या हातात म्हणून खोटे गुन्हे दाखल करत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी विरोध केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा जरांगे-पाटील यांनी यावेळी केला.
हेही वाचा 

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील आज ‘जेजुरी’ दौऱ्यावर
Manoj Jarange Patil | मराठा समाजाला ‘ओबीसी’त घ्या आणि शक्य झाल्यास ‘ओबीसी’चे आरक्षण वाढवा : मनोज जरांगे पाटील
आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचीच वेळ दिलीय : मनोज जरांगे पाटील

The post धाराशिव: परंडा येथे रात्री दोन वाजता जरांगे-पाटलांची सभा : महिलांची मोठी गर्दी appeared first on पुढारी.

परंडा, पुढारी वृत्तसेवा : सभेला यायला उशीर होतोय, परंतु ठिकठिकाणी मराठा बांधव पाहिल्यानंतर वाटेत थांबावं लागतंय. त्यांना डावलून जाऊ शकत नाही. रात्रीचे २ वाजले असतानाही आपण सर्व विशेषतः महिला सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आरक्षण किती महत्वाचे आहे, हे यावरून तुमच्या लक्षात आल्याचे दिसते. मराठा आरक्षण ७० वर्ष थोपवून ठेवलंय. आपल्या लेकरांनी …

The post धाराशिव: परंडा येथे रात्री दोन वाजता जरांगे-पाटलांची सभा : महिलांची मोठी गर्दी appeared first on पुढारी.

Go to Source