टाटा मोटर्सने कमावला 17407 कोटीचा नफा

टाटा मोटर्सने कमावला 17407 कोटीचा नफा

मुंबई :
ऑटो मोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून निव्वळ नफ्यामध्ये तब्बल 222 टक्क्यांची वाढ नोंदली असल्याचे समजते. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत कंपनीने 17407 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. याच कालावधीमध्ये कंपनीने 14 टक्के वाढीसोबत 1.2 लाख कोटी रुपये इतका महसूल मिळवला आहे.  संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2024 करिता 6 रुपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला आहे.  असे जरी असले तरी टाटा मोटर्सचे समभाग शेअर बाजारात सोमवारी 9 टक्के इतके घसरणीत राहिलेले पहायला मिळाले. एनएसईवर कंपनीचा समभाग सकाळी 1005 रुपयांवर खुला झाला होता. समभाग खुला होताच काही मिनिटातच 9 टक्के घसरणीसह 947 रुपयांवर आला होता. कंपनीच्या भविष्यकालीन कामकाजाबाबत निराशादायी अंदाज वर्तविला गेल्याने कंपनीचे समभाग घसरणीत राहिले होते.