किरकोळ महागाईचा 11 महिन्यांतील निचांक

किरकोळ महागाईचा 11 महिन्यांतील निचांक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 4.83 टक्क्मयांवर आला आहे. महागाईचा हा गेल्या 11 महिन्यांतील निचांकी स्तर आहे. जून 2023 मध्ये हा दर 4.81 टक्के नोंद झाला होता. तर एक महिन्यापूर्वी म्हणजेच मार्च 2024 मध्ये महागाई दर 4.85 टक्के होता. महागाईचा दर कमी झाला असला तरी एप्रिल महिन्यात  खाद्यपदार्थ महागाई वाढली आहे. अन्नधान्य महागाई दर 8.52 टक्क्यांवरून  8.78 टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्रामीण चलनवाढीचा दर 5.45 टक्क्यांवरून 5.43 टक्क्यांवर आला असून शहरी चलनवाढीचा दर 4.14 टक्क्यांवरून 4.11 टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने सोमवार, 13 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली.