भारतीय शेअरबाजारअल्पशा तेजीसोबत बंद

सेन्सेक्स 111 अंकांनी तेजीत, टाटा मोटर्स नुकसानीत वृत्तसंस्था/ मुंबई सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार पहायला मिळाला. सेन्सेक्स निर्देशांक 111 अंकांनी वधारत बंद झाला होता. टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले होते. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 111 अंकांनी वाढत 72,776 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय […]

भारतीय शेअरबाजारअल्पशा तेजीसोबत बंद

सेन्सेक्स 111 अंकांनी तेजीत, टाटा मोटर्स नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढउतार पहायला मिळाला. सेन्सेक्स निर्देशांक 111 अंकांनी वधारत बंद झाला होता. टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 111 अंकांनी वाढत 72,776 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 48 अंकांनी वाढत 22104 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 17 समभाग तेजीसोबत आणि 13 समभाग घसरणीसोबत बंद झाले होते. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक 8 टक्के इतके घसरणीत राहिले होते. कंपनीचा समभाग 87 रुपयांनी घसरुन 959 रुपयांवर बंद झाला होता. फार्मा क्षेत्रातील कंपनी सिप्लाचे समभाग मात्र 6 टक्के इतके वाढले होते. इंडिजिन लिमीटेड यांचा समभाग 45 टक्के प्रीमीयमसह 659 रुपयांवर बीएसईवर सूचीबद्ध झाला होता.
शेअर बाजारात एशियन पेंटस्, अदानी पोर्टस्, डीव्हीज लॅब्ज आणि अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग तेजीमध्ये राहिले होते. दुसरीकडे बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी आणि ओएनजीसी या कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिलेले पहायला मिळाले. फार्मा, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातल्या समभागांनी सोमवारी बाजाराला चांगला आधार दिलेला पाहायला मिळाला.
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि टीसीएस यांचे समभाग सोमवारी सकारात्मक तेजीसह कार्यरत होते. शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रामध्ये सेन्सेक्स जवळपास 798 अंकांपर्यंत खाली आला होता.  निफ्टी निर्देशांकदेखील 22 हजार अंकांच्या पातळीखाली घसरलेला होता. बीएसई मिड कॅप निर्देशांक 0.36 टक्के वाढला होता. तर स्मॉल कॅप निर्देशांक 0.23 टक्के घसरलेला होता.
जागतिक बाजारामध्ये सोमवारी मिश्र कल पहायला मिळाला. अमेरिकेमध्ये डोव्ह जोन्स 6 अंकांच्या वाढीसह कार्यरत होता. तर नॅसडॅक मात्र 5 अंकांनी घसरणीत व्यवहार करत होता. युरोपातील बाजारात चढउताराचा कल पहायला मिळाला. आशियाई बाजारातदेखील काहीशी हीच परिस्थिती पहायला मिळाली. हँगसेंग 151 अंकांनी वाढीसोबत कार्यरत होता. तर निक्केई 124, कोस्पी 10 आणि शांघाई कंपोझिट 6 अंकांनी घसरणीत व्यवहार करीत होता.