केंद्राकडून राज्यांना मिळाला भरीव निधी
उत्तरप्रदेशला सर्वाधिक 25 हजार कोटीचे कर हस्तांतरण : बिहारच्या वाट्याला 14 हजार कोटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने जूनसाठी राज्यांचे 1,39,750 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण (टॅक्स डिव्होल्युशन) जारी करण्यास मंजुरी दिली आहे. डिव्होल्युशन अमाउंटसोबत एक अतिरिक्त हप्ता जारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
टॅक्स डिव्होल्युशन म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांदरम्यान करमहसुलाचे वाटप. केंद्र आणि राज्यांदरम्यान काही करांद्वारे प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला योग्य आणि न्यायसंगत पद्धतीने वितरित करण्यासाठी स्थापन ही एक घटनात्मक व्यवस्था आहे.
सध्या केंद्र सरकार जो कर संकलित करते, त्याचा 41 टक्के हिस्सा राज्यांना एका आर्थिक वर्षात 14 हप्त्यांमध्ये वितरित केला जातो. 2024-25 या आर्थिक वर्षात जून महिन्यासाठी जारी करण्यात आलेल्या या रकमेसोबत एकूण 2 लाख 79 हजार 500 कोटी रुपये राज्यांना देण्यात आले आहेत.
नव्या हप्त्यात सर्वाधिक करहस्तांतरण प्राप्त करणाऱ्या राज्यांमध्ये उत्तरप्रदेश (25,069 कोटी) पहिल्या स्थानावर आहे. बिहार (14,056 कोटी) दुसऱ्या तर मध्यप्रदेश (10,790 कोटी) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सर्वात कमी निधी सिक्कीमला (542 कोटी) प्राप्त झाला आहे.
राज्यांच्या विकासाकरता खर्च
देशाच्या सर्व राज्यांचा विकास समानतेने व्हावा याकरता वित्त आयोग निधीचे वाटप करत असतो. याकरता एक सूत्र अवलंबिले जाते. यात राजकोषीय क्षमता, राजकोषीय शिस्त, राज्याची लोकसंख्या, राज्याचे क्षेत्रफळ विचारात घेतले जाते. याचमुळे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार यासारख्या राज्यांना अधिक निधी प्राप्त होत असतो.
करहस्तातंरणाद्वारे प्राप्त निधी
राज्य टॅक्स डिव्होल्युशन
आंध्रप्रदेश 5,655.72 कोटी
अरुणाचल प्रदेश 2,455.44 कोटी
आसाम 4,371.38 कोटी
बिहार 14,056.12 कोटी
छत्तीसगड 4,761.30 कोटी
गोवा 539.42 कोटी
गुजरात 4,860.56 कोटी
हरियाणा 1,527.48 कोटी
हिमाचल प्रदेश 1,159.92 कोटी
झारखंड 4,621.58 कोटी
कर्नाटक 5,096.72 कोटी
केरळ 2,690.20 कोटी
मध्यप्रदेश 10,970.44 कोटी
महाराष्ट्र 8,828.08 कोटी
मणिपूर 1,000.60 कोटी
मेघालय 1,071.90 कोटी
मिझोरम 698.78 कोटी
नागालँड 795.20 कोटी
ओडिशा 6,372.92 कोटी
पंजाब 2,525.32 कोटी
राजस्थान 8,421.38 कोटी
सिक्कीम 542,.22 कोटी
तामिळनाडू 5,700.44 कोटी
तेलंगणा 2,937.58 कोटी
त्रिपुरा 989.44 कोटी
उत्तरप्रदेश 25,069.88 कोटी
उत्तराखंड 1,562.44 कोटी
पश्चिम बंगाल 10,513.46 कोटी
Home महत्वाची बातमी केंद्राकडून राज्यांना मिळाला भरीव निधी
केंद्राकडून राज्यांना मिळाला भरीव निधी
उत्तरप्रदेशला सर्वाधिक 25 हजार कोटीचे कर हस्तांतरण : बिहारच्या वाट्याला 14 हजार कोटी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्र सरकारने जूनसाठी राज्यांचे 1,39,750 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण (टॅक्स डिव्होल्युशन) जारी करण्यास मंजुरी दिली आहे. डिव्होल्युशन अमाउंटसोबत एक अतिरिक्त हप्ता जारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे. टॅक्स डिव्होल्युशन म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य […]