बिडी येथील मुस्लीम बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बिडी येथील मुस्लीम बांधवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : बिडी (ता. खानापूर) गावच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व्हे क्र. 79अ/6 मधील 25 गुंठे जमिनीमध्ये मुस्लीम बांधव अनेक वर्षांपासून सण साजरे करत आहेत. सदर जमीन मुस्लीम समाजाच्या नावे करून देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जामिया मशीद मुस्लीम जमात कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बिडी गावच्या व्याप्तीत येणाऱ्या या जमिनीमध्ये मुस्लीम बांधव रमजान, बकरी ईद आदी सण साजरे करत आहेत. अनेक वर्षांपासून ही प्रथा आहे. असे असताना सदर जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर सरकार असे नमूद केले आहे. जुन्या कागदपत्रांमध्ये इदगा जमीन असे नमूद आहे. त्यानुसार सदर जमीन मुस्लीम जमात बिडी यांच्या नावे करावी. यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे सादर केली असून त्यानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांना निवेदन दिले.