तिमाही निकालानंतर ओबेरॉय रियल्टीचे समभाग वधारले

तिमाही निकालानंतर ओबेरॉय रियल्टीचे समभाग वधारले

788 कोटी रुपयांचा कमावला नफा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली 
ओबेरॉय रियल्टीच्या समभागाने गुरुवारी 9 टक्क्यांनी उसळी घेत 1,712.30 रुपयांच्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांकावर झेप घेतली होती. समभागातील वाढीमुळे कंपनीचे बाजारमूल्य 57,176 कोटी रुपये झाले आहे. मार्च आर्थिक वर्ष 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत मुंबईस्थित रिअल इस्टेट डेव्हलपरचा निव्वळ नफा 64 टक्क्यांनी वाढून 788 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आतापर्यंतच्या तिमाहीतील नफा पाहिल्यास कंपनीचा हा आताचा सर्वाधिक नफा आहे. कंपनीला मजबूत मागणीचा फायदा अधिककरुन झाला आहे.
4 हजार कोटी उभारणार
नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर आणि इक्विटी शेअर्सच्या क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे 4,000 कोटी रुपये उभारण्यासाठी ओबेरॉय रियल्टीला त्यांच्या संचालक मंडळाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात सदरची रक्कम उभारण्याचा मार्ग एकार्थी मोकळा झाला आहे. निधी उभारणी योजनेमध्ये किंमत प्लेसमेंटद्वारे 2,000 कोटी रुपयांपर्यंतचे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करणे समाविष्ट आहे, तर उर्वरित क्यूआयपी अन्य मार्गाने उभारले जातील.