आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी 

औषधावर दिलेली लिमलेटची गोळी

 

आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखरेचा खडा

शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा

 

आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात

मेतकूट कालवलेला मऊ तूपभात

 

आई म्हणजे देव्हाऱ्यातील लक्ष्मीचे चित्र

सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र

– शांता शेळके