राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी बेळगावच्या 11 खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी बेळगावच्या 11 खेळाडूंची निवड

बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या विविध गटातील 11 बुद्धिबळपटूंची कर्नाटक राज्य गोल्डन चेस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बेळगावचे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ स्पर्धेत बेळगाव शहरातील विविध गटातील अनेक विद्यार्थी अनेक खेळाडूंनी भाग घेतला होता. त्या स्पर्धेत अव्वल कामगिरी केलेल्या बुद्धिबळपटूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये परीक्षित एस एम. 7 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकावलेल्या ,गितेश सागेकर 11 वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक, अनिऊद्ध दासारी 13 वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक, माधव दासारी 15 वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक, साईप्रसाद कोकाटे 17 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक, सारा कागवाड 9 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक, अहदिया सय्यद 11 वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक, वैष्णवी व्ही,15 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक, व अर्पिता माडीवाले  दुसरा क्रमांक, वैभवी भट 17 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक तर श्रद्धा कारेगार दुसरा क्रमांक. फटकाविला. वरील सर्व बुद्धिबळपटूंची बेंगलोर येथे होणाऱ्या गोल्डन स्क्वेअर राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून हे सर्व खेळाडू बेंगलोरला रवाना होणार आहेत. या सर्व खेळाडूंना बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय राव व प्रशांत अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.