संजीवनी जाधव विजेती

संजीवनी जाधव विजेती

वृत्तसंस्था/ पोर्टलँड (अमेरिका)
येथे नुकत्याच झालेल्या पोर्टलँड ट्रॅक आणि फिल्ड अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला धावपटू तसेच आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्यपदक विजेती संजीवनी जाधवने महिलांच्या 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत प्रथम स्थान पटकाविले.
महिलांच्या 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत 27 वर्षीय संजीवनीने 32 मिनिटे, 46.88 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद पटकाविले. या क्रीडा प्रकारात भारताच्या सीमाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 3000 मी. स्टिपलचेसमध्ये महाराष्ट्रातला धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला. अमेरिकेच्या केनिथ रुक्सने पुरुषांच्या 3000 मी. स्टिपलचेसमध्ये पहिले स्थान पटकाविले. महिलांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या पारुल चौधरीने तिसरे स्थान मिळविले.