राशी भविष्य

राशी भविष्य

नक्षत्रांचे देणे आणि ज्योतिर्लिंगांचे रहस्य -भाग अंतिम

चित्रा-विश्वकर्मा भगवानांची उपासना करावी. मंगळवारच्या दिवशी तूप आणि सात प्रकारच्या धान्यांचे दान करावे. अश्वगंधा झाडाच्या मुळीला धारण करावे 15. स्वाती- जगदंबेच्या सरस्वती रूपाची पूजा करावी. कधीही भडक रंगाचे कपडे घालू नये. हलक्मया रंगाचे कपडे घालावे. जायफळाच्या झाडाची मुळी धारण करावी. 16 विशाखा- विष्णुसहस्रनामाचे पाठ करावे. लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. जर शक्मय असेल तर काळी म्हैस दान करावी. गुंजाच्या झाडाची मुळी धारण करू शकता. 17. अनुराधा- लाल आणि सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर जास्तीत जास्त करावा. शनि महाराजांची उपासना करावी. नागकेशराच्या झाडाला कधीही तोडू नये. नागकेशराचे झाड लावावे. 18. ज्येष्ठा-विष्णूची आराधना करावी. व्यंकटेशस्तोत्राचे पाठ करावे. आपामार्ग नावाच्या झाडाची मुळी धारण करावी. 19. मूळ- शंकराची आराधना करावी. नेहमी दोन रंगाचे कपडे धारण करावे. मंदार वृक्षाच्या झाडाची मुळी धारण करावी 20. पूर्वाषाढा- लक्ष्मी सहस्त्रनामाचे पाठ करावे. भृंगराज झाडाच्या मुळीला धारण करावे. 21. उत्तराषाढा-भगवान जगन्नाथाची उपासना करावी. गणपतीची उपासना ही लाभदायक ठरते. आघाड्याची मुळी धारण करू शकता. 22. श्र्रवण-लक्ष्मी नारायणाची उपासना करावी. श्रावण सुरू होण्याच्या अगोदर नऊ दिवस खास करून उपासना करावी.

श्रीमद्भागवत आणि गीतेचे पाठ करून द्यावे. आपामार्गाच्या झाडाच्या मुळीला धारण करावे. 23. धनिष्ठा-तीर्थक्षेत्रांना जात रहावे. दुर्गा सप्तशतीचे पाठ करून घ्यावे. कमळ, गुलाब, चमेली, आणि बेल याच्या  फुलांचे चूर्ण जवळ ठेवावे. 24.  शततारका – शिव आराधना करावी. ॐ नम: शिवाय मंत्राचा जास्तीत जास्त पाठ करावा. सुकलेल्या कमळाला चांदीच्या ताईतामध्ये धारण करावे 25. पूर्वाभाद्रपदा- विष्णुसहस्रनामाचे जप करावे. चमड्यापासून बनलेल्या वस्तू आणि काळ्या रंगापासून दूर रहावे. नि:स्वार्थ भावनेने सेवा करावी. 26. उत्तराभाद्रपदा-जगदंबेची उपासना करावी. पिंपळाच्या मुळीला धारण करावे. 27. रेवती- विष्णुसहस्रनामाचे पाठ करावे. पिंपळाच्या मुळीला धारण करावे तसा.
12 हा आकडा कमाल आहे! ‘आता वाजले की बारा’ पासून’ त्याचे बारा वाजले’  अशा  कित्येक वाक्मयप्रचारांमध्ये उपयोग केला जाऊ शकतो!  पण कधी विचार केलाय का की बारा राशी आणि बारा ज्योतिर्लिंग यांचे काही कनेक्शन असेल? प्रत्येक राशीचा संबंध एका ज्योतिर्लिंगाशी आहे आणि त्याराशीच्या लोकांनी त्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आणि उपासना केली तर त्याचा फायदा नक्कीच होतो.
क्रम.         राशी         ज्योतिर्लिंग              राज्य
1       वृषभ        सोमनाथ                   गुजरात
2       कन्या      मल्लिकार्जुन          आंध्रप्रदेश
3       तूळ महाकालेश्वर          मध्यप्रदेश
4      कर्क ओंकारेश्वर     मध्यप्रदेश
5       कुंभ केदारनाथ                उत्तराखंड
6       मकर        भीमाशंकर               महाराष्ट्र
7      धनु  काशी विश्वनाथ    उत्तर प्रदेश
8      मीन         त्र्यंबकेश्वर               महाराष्ट्र
9       वृश्चिक   वैद्यनाथ                  महाराष्ट्र
10     मिथुन     नागेश्वर          गुजरात
11     मेष  रामेश्वर           तमिळनाडू
12     सिंह घुश्मेश्वर                  महाराष्ट्र
 
 
 
राशीफल 3 एप्रिल 2024    
मेष
तुम्ही मिळवत असलेल्या शिक्षणात भरघोस यश मिळण्याची शक्मयता आहे. विद्यार्थ्यांना हा आठवडा छान जाईल. तुमच्या बोलण्याची इतरावर चांगलाच छाप पडेल. कुटुंबासमवेत वेळ चांगला घालवाल. पैतृक संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्मयता आहे. काही कारणास्तव नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. एकूण या आठवड्यात तुमचे मन प्रसन्न राहील.
उपाय: कुलदेवतेची आराधना करा.
वृषभ
नोकरीमध्ये आपल्या व्यवस्थितपणे केलेल्या कामावर आपले वरिष्ठ खुश होतील. आपल्याला आपली भावंडे, मित्र बऱ्याच दिवसांनी भेटण्याचा संभव आहे. त्यामुळे या आठवड्यात आपण अत्यंत आनंदी असाल. त्यांच्याबरोबर छोट्या सहलीचे आयोजन कराल. त्यांच्याबरोबर पंचपक्वानांचा आस्वाद घ्याल. पण सांभाळून. ऊन वाढते आहे. प्रकृतीला सांभाळा.
उपाय: मुक्या प्राण्यांना पाणी पाजा.
मिथुन
या आठवड्यात आपल्याला मातेचा सहवास पुरेपूर मिळण्याचा संभव आहे. वाहन खरेदीचा विचार चालला असेल तर त्याप्रमाणे प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या विद्याभ्यासामध्ये चांगले यश मिळण्याची शक्मयता आहे. आपल्या जमीन जुमल्याच्या बाबतीत काही चर्चा चालली असेल तर ती कदाचित पूर्णत्वाला येण्याचा संभव आहे.
उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.
कर्क
आपल्या मुलांच्या विद्याभ्यासाकडे लक्ष द्या. प्रलोभने वाढली आहेत. आपली मुले या प्रलोभनांना बळी पडत नाहीत ना याकडे लक्ष द्या. आपलीही काही नवीन विद्या शिकण्याची इच्छा असेल तर जरूर प्रयत्न करा. कविता वाचन अथवा लेखन करायचे असल्यास जरूर प्रयत्न करा. यश मिळेल. लॉटरीसारख्या प्रकारातून अचानक धनलाभाची शक्मयता आहे.
उपाय: महादेवाची आराधना करा.
सिंह
तब्येतीला सांभाळा. असे हा आठवडा तुम्हास सांगत आहे. ऊनही वाढत आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या प्रकाराला बळी पडू नका. वेळीच उपचार करा. शत्रूपासून सावध रहा. जिथे आपल्याला मान मिळेल, अशा ठिकाणीच जाण्याचा विचार करा. आपल्या मौल्यवान वस्तूंना जपा. नोकरावर फार विश्वास नको. मन सतत साशंकतेने भरून राहील. मनावर ताबा ठेवा.
उपाय:नामस्मरण करीत जा.
कन्या
ज्यांचा स्वतंत्र व्यवसाय असेल त्यांची दैनंदिन प्राप्ती चांगली राहील असे दिसते. थोडा अध्यात्माकडे कल वळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या भागीदारी संदर्भात काही कोर्टाचे झमेले असतील तर तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. पण शक्यतो वादविवादाच्या भानगडीत पडू नका. वादाने   सुटत नाहीत, ते आणखीन चिघळतात. हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता आहे.
उपाय: हनुमान चालीसा वाचा.
तूळ
लॉटरीतून पैसा अगर गुप्त धन मिळण्याची शक्मयता आहे. पण ते धन चांगल्या मार्गाने येत असेल तरच त्याचा स्वीकार करा. अन्यथा ते द्रव्य तुम्हाला सुखासुखी लाभणार नाही. कोणतीतरी मानसिक व्यथा आपल्याला सतावत राहील. कुठेतरी झाडाझुडूपात जाऊ नका. नसते धाडस अंगाशी येईल. गैरमार्गाने पैसा मिळवण्याचा अजिबात प्रयत्न कऊ नका.
उपाय: भुकेलेल्यांना खाऊ पिऊ घाला.
वृश्चिक
भाग्योदयाचे दार उघडले आहे, असे समजा. आणि परमेश्वराने ही एक संधी आपल्याला दिली आहे, त्याचा सदुपयोग करून घ्या. सत्संगाचा लाभ करून घ्या. कुठेतरी तीर्थयात्रा होण्याचा संभव आहे. शक्मय होईल तितका परोपकार करा. वडील मंडळींचे आशीर्वाद मिळवा. एखादे धर्म कार्य आपल्या हातून घडण्याची शक्मयता आहे. परमेश्वरावर नितांत श्र्रद्धा ठेवा.
उपाय: मारु तीची उपासना करा.
धनु
आपल्या उद्योगधंद्यात भरभराट होण्याची शक्मयता आहे. नोकरीत असाल तर पदोन्नती होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सहाजिकपणे समाजात मान प्रतिष्ठा वाढेल. समाजातील दर्जा वाढेल. स्वतंत्र उद्योगात असाल तर वडिलांचे सर्वतोपरी सहाय्य लाभेल. त्यांचे आशीर्वाद मिळतील. कर्ज मिळवायच्या प्रयत्नात असाल तर आणखी थोड्या प्रयत्नाने कर्ज मिळण्याची शक्मयता आहे.
उपाय: रोज घरातून बाहेर पडताना कपाळावर गंधाचा टिळा लावा.
मकर
हा आठवडा तुमचा तुमच्या भावंडासमवेत अथवा मित्रासमवेत आनंदात जाण्याची शक्मयता आहे. चांगले नवे मित्र मिळण्याची शक्मयता आहे. उंची वस्तूंचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आठवड्यात अनेक प्रकारचे लाभ होतील. एखाद्या समारंभात भाग घ्याल. नवीन ओळखी होतील. मन आनंदी राहील. एकूण हा आठवडा छान आनंदात आणि समाधानात जाईल.
उपाय:दत्ताची आराधना करा.
कुंभ
खर्चावर नियंत्रण ठेवण्याची अत्यंत गरज आहे. अपव्यय होऊ देऊ नका. दूरचा प्रवास अगर परदेशी जाण्याची शक्मयता आहे. पण प्रवास करताना सांभाळून करा. अति कुठले धाडस करु नका. शारीरिक इजा होण्याचाही संभव आहे. डोक्यावर कर्ज असेल तर ते लवकर फेडण्याचा प्रयत्न करा. राजकारणात असाल तर अतिशय सावधान राहणे गरजेचे आहे.
उपाय: तहानलेल्याला पाणी द्या.
मीन
मन चंचल राहील. मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करा. तसा हा आठवडा तुमचा छान आनंदात जाईल असे वाटते. पण काळजी घ्या, असे सांगावेसे वाटते. कोणत्याही गोष्टीची अति हाव कऊ नका. जेवढे मिळेल त्यात समाधान माना. अति क्रोध पण बरा नव्हे.तुमची महत्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्मयता आहे. पण त्यासाठी अट्टाहास करणे बरे नव्हे. स्वत:ला सांभाळा.
उपाय: रोज नित्य नेमाने तुळशीची पूजा करा.