खादरवाडी-बस्तवाड परिसरात रंगोत्सव उत्साहात

खादरवाडी-बस्तवाड परिसरात रंगोत्सव उत्साहात

वार्ताहर /किणये
खादरवाडी, बस्तवाड हलगा या परिसरात सोमवारी रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत रंग खेळण्यात आले. या गावांमध्ये होळीचे दहन रविवारी रात्रीच करण्यात आले होते. सोमवारी होणाऱ्या रंगपंचमीची तयारी जय्यत करण्यात आली होती. सोमवारी सकाळपासूनच सारे जण एकमेकांवर रंग उधळताना दिसत होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातील देवदेवतांची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर साऱ्यानी रंग खेळण्यास उत्साहात सुरुवात केली. तरुण वर्ग, बालचमू व महिलांनी एकमेकांवर रंग उधळले. काही ठिकाणी डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसत होती.