मालीवाल यांच्‍याशी गैरवर्तन : ‘आप’ने सोडले मौन, संजय सिंह म्‍हणाले…

मालीवाल यांच्‍याशी गैरवर्तन : ‘आप’ने सोडले मौन, संजय सिंह म्‍हणाले…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनप्रकरणी ‘आप’ने आज (दि.१४) मौन सोडले. याबाबत आपचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पक्षाची भूमिका स्‍पष्‍ट केली.
केजरीवालांनी घेतली दखल, संबंधितांवर कठोर कारवाई होणार
माध्‍यमांशी बोलताना संजय सिंह म्‍हणाले की, सोमवारी घडलेला प्रकार हा अत्‍यंत निंदनीय होता. या संपूर्ण घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचे संजय सिंह यांनी सांगितले. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल. स्वाती मालीवाल यांनी देश आणि समाजाच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या आहेत. त्या पक्षातील ज्येष्ठ आणि जुन्या नेत्यांपैकी एक आहेत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

“Arvind Kejriwal has taken cognizance, directs for strict action”: Sanjay Singh after Swati Maliwal assaulted at Delhi CM residence
Read @ANI Story | https://t.co/YhhbXKldzf#Swatimaliwal #Sanjaysingh #AAP pic.twitter.com/mfE2RXLLY6
— ANI Digital (@ani_digital) May 14, 2024

काय घडलं होतं?
आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. ड्रॉईंग रूममध्ये स्वाती मालीवाल अरविंद केजरीवाल यांची वाट पाहत होत्या. दरम्यान, निवासस्थानातील कर्मचारी वैभव कुमार आले आणि त्यांनी स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केले. या प्रकरणी सोमवारी दिवसभरात आपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नव्‍हती. मात्र आज संजय सिंह यांनी पक्षाची भूमिका स्‍पष्‍ट केली.
नियमानुसार दिल्ली पोलीस पूर्वपरवानगीशिवाय मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश करू शकत नाहीत. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “सकाळी 9:34 वाजता पीएस सिव्हिल लाईन्स येथे एका महिलेचा एक पीसीआर कॉल आला होता की मुख्यमंत्र्यांच्या घरी तिच्यावर हल्ला करण्यात आला आहे. काही वेळाने खासदार मालीवाल पीएस सिव्हिल लाईन्समध्ये आल्या, पण या तक्रार करणार असल्‍याचे सांगून त्या निघून गेल्या होत्‍या. पोलीस सध्या पीसीआर कॉल्सची सत्यता तपासत आहेत.”
हेही वाचा : 

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ‘आप’ला बनवले जाईल आरोपी : ‘ईडी’ची उच्च न्यायालयात माहिती
केजरीवालांना इन्सुलिन न दिल्याबद्दल आपचा हल्लाबोल मोर्चा
Aam Aadmi Party: आम आदमी पक्षाच्या ‘वॉशिंग मशीन का काला जादू’ प्रचार अभियानाचा शुभारंभ