स्मृती इराणींना पिछाडीवर टाकणाऱ्या किशोरी लाल शर्मांचं प्रियंका गांधींकडून अभिनंदन

स्मृती इराणींना पिछाडीवर टाकणाऱ्या किशोरी लाल शर्मांचं प्रियंका गांधींकडून अभिनंदन

उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा 90 हज़ार मतांनी आघाडीवर आहेत. ही आकडेवारी दुपारी 2.20 वाजेपर्यंतची आहे.

 

किशोरी लाल यांचं मताधिक्य पाहता, त्यांचा विजय आता जवळपास निश्चित आहे.

 

प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, किशोरी भैया, मला अजिबात संशय नव्हता. तुम्ही जिंकाल हा विश्वास होता. तुमचं आणि माझ्या अमेठीतल्या बंधू-भगिनींचंही हार्दिक अभिनंदन.

 

अमेठी गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ मानला जातो.

 

2019 मध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत केलं होतं.

 

यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने किशोरीलाल शर्मांना उमेदवारी दिली होती.

Go to Source