बारामतीचा निकाल यापेक्षा वेगळा लागेल असं कधी वाटलं नव्हतं- शरद पवार

बारामतीचा निकाल यापेक्षा वेगळा लागेल असं कधी वाटलं नव्हतं- शरद पवार

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकालाचे कल स्पष्ट होताच पत्रकार परिषद घेतली.

 

ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेचं आभार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, त्यासाठी संघटनेच्यावतीने आभार मानतो. हा निकाल परिवर्तनाला पोषक असा आहे. या निवडणुकीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या.

 

विशेष करून उत्तरप्रदेशमध्ये तुमच्या पोलपेक्षा वेगळं चित्र दिसलं. याचा अर्थ आमचे सहकारी चांगलं काम करत आहेत. मी कॉंग्रेसचे अध्यक्ष खरगे आणि इतक सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. कदाचित उद्या इंडीया आघाडीची दिल्लीत बैठक होईल. नितीशकुमारांशी आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी काहीही बोलणं झालेलं नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी राष्ट्रवादीला सात जागांवर पुढे आहोत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि नाना पटोले यांच्या नेतृत्वात चांगली कामगिरी झाली आहे.”

 

“बारामतीत यापेक्षा वेगळा निकाल लागेल असं मला कधी वाटलं नव्हतं. बारामतीतील सामान्यांची मानसिकता काय आहे हे मला ठाऊक आहे.”

Go to Source