पंतप्रधान मोदी यांचे समर्थ नेतृत्वच हवे !

पंतप्रधान मोदी यांचे समर्थ नेतृत्वच हवे !

भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या समर्थ नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उत्तराखंड वक्फ मंडळाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी केले आहे. सध्या जगावर युद्धाचे ढग दाटून आलेले आहेत. अशा स्थितीत देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वावरच विश्वास ठेवावा लागणार आहे. सध्याच्या गोंधळाच्या जागतिक वातावरणात अशाच नेतृत्वामुळे देश वाचू शकतो. आतापर्यंत त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या कणखर नेतृत्वामुळे देशात मोठा विकास घडवून आणला आणि देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम केली, अशी भलावण त्यांनी केली.
ओडीशाच्या मतदारांना परिवर्तन हवे !
ओडीशामध्ये गेली 25 वर्षे एकाच पक्षाचे आणि एकाच नेत्याचे सरकार राहिले आहे. त्यामुळे आता या राज्यातील मतदारांना परिवर्तन हवे आहे. भारतीय जनता पक्ष हा या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून यावेळी राज्याची सत्ता आणि लोकसभेच्या या राज्यातून निवडणूक येणाऱ्या बहुसंख्य जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांनी केले आहे.
ते ओडीशातील बालासोर येथे एका प्रचारसभेत भाषण करीत होते. बिजू जनता दलाच्या 25 वर्षांच्या कुशासनात गैरप्रकारांचा कळस झाला आहे. लोकांचे न्याय्य अधिकार संपविण्यात आले आहेत, असे अनेक आरोप त्यांनी केले.