पोतदार रॉयल्स, भाटे वॉरियर्स विजयी
बेळगाव : सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात पोतदार रॉयल्स सीसीआय व भाटे वॉरियर्स संघाने आकर्षक विजय नोंदविले. युनियन जिमखाना मैदानावर आजच्या पहिल्या सामन्यात पोतदार रॉयल्स संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाचा 51 धावांनी पराभव केला. पोतदार रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 160 धावा केल्या. त्यात अमित यादवने 44 चेंडूत 1 षटकार 11 चौकारांसह 73, अभिषेक देसाईने 3 षटकार एक चौकारांसह 30, आदर्श हिरेमठने 20 धावा केल्या. सुपर एक्सप्रेस युनियन जिमखानातर्फे केतज कोल्हापूरने 3, अनिल गौडा पाटील, मदन बेळगावकर, वसंत शहापूरकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सुपर एक्सप्रेस संघाने 17.3 षटकात सर्व बाद 109 धावा केल्या. त्यात विठ्ठल हबीबने 24, केतज कोल्हापुरने 19 धावा केल्या. पोतदार संघातर्फे अंगद राज हितलमनीने 4, अर्जुन पाटील व स्वंयम अपण्णावर प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामनावीर अमित यादव व इम्पॅक्ट खेळाडू अभिषेक देसाई यांना प्रमुख पाहुणे सिद्धार्थ तेंडुलकर, राजेश तेंडुलकर, चंद्रशेखर इटी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आजच्या दुसऱ्या थरारक सामन्यात भाटे वॉरियर्स संघाने के आर शेट्टी किंग्स संघाचा केवळ 2 गड्यांनी पराभव केला. 18 षटकांच्या खेळविण्यात आलेल्या या सामन्यात के आर शेट्टी किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार स्वप्नील येळवेच्या शानदार शतकाच्या जोरावर 18 षटकात चार बाद 180 अशी मोठी धावसंख्या रचली. कर्णधार स्वप्नील येळवेने 15 चौकार एका षटकारांसह 60 चेंडूत नाबाद 100 धावा करुन स्पर्धेतील पहिले शतक झळकविले. त्याला गुरुप्रसाद पोतदारने 6 चौकार व 2 षटकारांसह 35 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 139 धावांची दमदार भागीदारी केली. भाटे वॉरियर्सतर्फे फरान पाटील, भरत गडेकर व हार्दिक ओझा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भाटे वॉरियर्स 20 षटकात 8 गडी बाद 181 धावा करून सामना 2 गड्यांनी जिंकला. एक वेळ 5.2 षटकात पाच बाद 38 अशा केविलवाण्या अवस्थेत असताना भाटे वॉरियर्स संघाच्या रोहित पाटील व अमेय भातखंडे यांनी सहाव्या गड्यासाठी नोंदविलेल्या 74 चेंडूत 120 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भाटे वॉरियर्स संघाने एका अशक्य अशा विजयाची नोंद केली. सामनावीर रोहित पाटील याने केवळ 43 चेंडू 7 षटकार व 5 चौकार ठोकत 94 धावांचे योगदान दिले तर अमेय भातखंडेने आश्वासक फलंदाजी करत चार चौकारांसह 43 धावांचे योगदान दिले. भाटे वॉरियर्स संघाने 18 षटकात आठ बाद 181 धावा करत हा थरारक सामना जिंकला. के आर शेट्टी किंगतर्फे नरेंद्र मांगोरे व आदित्य वारंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सामनावीर रोहित पाटील व इम्पॅक्ट खेळाडू स्वप्निल येळवे यांना प्रमुख पाहुणे सुधीर पाणारे, सचिन कलवार व रणजीपटू वैभव गोवेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Home महत्वाची बातमी पोतदार रॉयल्स, भाटे वॉरियर्स विजयी
पोतदार रॉयल्स, भाटे वॉरियर्स विजयी
बेळगाव : सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात पोतदार रॉयल्स सीसीआय व भाटे वॉरियर्स संघाने आकर्षक विजय नोंदविले. युनियन जिमखाना मैदानावर आजच्या पहिल्या सामन्यात पोतदार रॉयल्स संघाने सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना संघाचा 51 धावांनी पराभव केला. पोतदार रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 […]