पंतप्रधान मोदींचे मणिपूरकडे दुर्लक्ष : गौरव गोगोई

पंतप्रधान मोदींचे मणिपूरकडे दुर्लक्ष : गौरव गोगोई

तपास यंत्रणांचा गैरवापर सुरूच राहणार
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मंगळवरी पुन्हा एकदा मणिपूरमधील हिंसेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. हिंसाग्रस्त मणिपूरमधील सद्यस्थितीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या टिप्पणीवर लक्ष पंतप्रधान मोदी देतील अशी अपेक्षा नाही. मोदी हे सध्या ईशान्येतील राज्यांकडे दुर्लक्षच करतील. याचबरोबर कायदा-अंमलबजावणी यंत्रणांचा दुरुपयोग करत भारतीय घटनेत बदल करण्याचा प्रयत्न करतील असा दावा गोगोई यांनी केला आहे.
एक वर्षापेक्षा अधिक काळापसून मणिपूरमध्ये स्थिती चिंताजनक राहिल्याने सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी चिंता व्यक्त केली होती. संकटात सापडलेल्या राज्याच्या स्थितीवर प्राथमिकतेसोबत विचार केला जावा असेही त्यांनी म्हटले होते.
लोकांनी ‘इंडिया’ आघाडीला स्वत:च्या वतीने बोलण्यासाठी भारतीय संसद आणि घटनेच्या रक्षणासाठी निवडले असल्याचे गोगोई यांनी म्हटले आहे. गोगोई हे आसामच्या जोरहाट मतदारसंघातून 1.44 लाख मतांनी विजयी झाले आहेत.