पतंजली फूड्स लिमिटेडचा नफा 22 टक्क्यांनी घटला

पतंजली फूड्स लिमिटेडचा नफा 22 टक्क्यांनी घटला

घटीसह नफा 206 कोटी रुपयांवर : वार्षिक उत्पन्न 4 टक्क्यांनी वधारले
मुंबई :
पतंजली फूड्स लिमिटेडचा आर्थिक वर्ष 2024च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) नफा वार्षिक 22 टक्क्यांनी कमी होऊन 206 कोटी झाला. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा 264 कोटी होता. पतंजलीने आज 14 मे रोजी चौथ्या तिमाहीचे आणि वार्षिक निकाल जाहीर केले आहेत.
पतंजलीने प्रति शेअर 6 रुपये लाभांश जाहीर केला. आर्थिक वर्ष 2024 साठी प्रति शेअर 6 चा अंतिम लाभांश देखील जाहीर करण्यात आला आहे. कंपन्या नफ्यातील काही भाग त्यांच्या भागधारकांना देतात, त्याला लाभांश म्हणतात. निकालापूर्वी, पतंजलीचे शेअर्स 0.46 टक्क्यांनी वाढून 1,337 वर बंद झाले. गेल्या एका वर्षात 40.30 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 48.29 हजार कोटी रुपये आहे.
वार्षिक आधारावर उत्पन्नात 4 टक्के वाढ
फूड प्रोसेसिंग कंपनीच्या कामकाजातील महसूल वार्षिक आधारावर 4.43टक्के वाढला आहे. चौथ्या तिमाहीत आर्थिक वर्ष 2024 मध्ये ऑपरेशन्समधील महसूल 8,221 कोटी होता. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 23 च्या चौथ्या तिमाहीत महसूल 7,872 कोटी होता. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या नफ्यात 13.65 टक्क्यांने घट झाली. पूर्ण आर्थिक वर्ष 2024 साठी कंपनीचा नफा 13.65ज्ञ् ने घसरून 765 कोटी झाला. आर्थिक वर्ष 2023 मध्ये नफा 886 कोटी रुपये होता.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये महसूल 31,721 कोटी होता. त्याच वेळी, 2024 च्या आर्थिक वर्षात कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल वाढून  31,721 कोटी झाला. आर्थिक वर्ष 2023 मध्ये महसूल 31,524 कोटी होता. म्हणजेच महसूल 0.62 टक्क्यांनी वाढला आहे.