आता बीएमसी रेल्वे स्थानकांवरील टॉयलेट स्वच्छ करणार
मुंबईकरांना स्वच्छ अशी स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) यासंदर्भात पुढाकार घेण्यास सांगितलं आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेत.रेल्वेकडे मनुष्यबळ नसल्याने रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांची साफसफाई होत नाही. याबाबत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. याआधी हद्दीचा वाद असल्याने स्वच्छतागृहांच्या साफसफाईचा प्रश्न कायम होता. पण आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य देत मुंबई महापालिकेने स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही सूचित केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचावायू प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाइन सुरूअखेर मुहूर्त ठरला, नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू होणार
मुंबईकरांना स्वच्छ अशी स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) यासंदर्भात पुढाकार घेण्यास सांगितलं आहे. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेत.
रेल्वेकडे मनुष्यबळ नसल्याने रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांची साफसफाई होत नाही. याबाबत प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. याआधी हद्दीचा वाद असल्याने स्वच्छतागृहांच्या साफसफाईचा प्रश्न कायम होता. पण आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य देत मुंबई महापालिकेने स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही सूचित केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.