म्हाडाकडून १०० गिरणी कामगारांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

म्हाडाकडून १०० गिरणी कामगारांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र १०० गिरणी कामगार आणि वारसांना सातव्या टप्प्यांतर्गत आज (दि.१६) सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. MHADA
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला गिरणी कामगार घर संनियंत्रण समितीचे अध्यक्ष व आमदार श्री. सुनील राणे, आमदार श्री. कालिदास कोळंबकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मिलिंद बोरीकर, उपमुख्य अधिकारी श्री. योगेश महाजन आदी उपस्थित होते.
आमदार सुनील राणे म्हणाले की, आतापर्यंत सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र व सदनिकेच्या विक्री किंमतीचा, मुद्रांक शुल्काचा भरणा केलेल्या १३१० गिरणी कामगारांना १५ जुलै, २०२३ पासून सहा टप्प्यांत सदनिकांच्या चावीचे वाटप करण्यात आले आहे. MHADA
आजच्या सातव्या टप्प्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळीच्या मुहूर्तावर स्वतःच्या हक्काच्या घरात प्रवेश करण्याची सुवर्णसंधी गिरणी कामगार/ वारस यांना मिळाली असून याबद्दल समाधान वाटत असल्याचे आमदार  सुनील राणे यांनी सांगितले. उर्वरित गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीचे काम वेगाने सुरू असून विक्री किंमतीचा व मुद्रांक शुल्क भरणा भरणा केलेल्या पात्र गिरणी कामगारांना लवकरच सदनिकांच्या चावीचे वाटप केले जाईल, असे सुनील राणे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिळकत व्यवस्थापक रामचंद्र भोसले आदींसह अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 MHADA : आतापर्यंत ८०४६७ गिरणी कामगारांची कागदपत्रे सादर
बृहन्मुंबईतील ५८ बंद/आजारी गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता कालबद्ध विशेष अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत ऑफलाइन कागदपत्रे वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे सुरू आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने www.millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध असून ॲण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये mill workers eligibility या नावाने ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत ७०२६७ गिरणी कामगार / वारसांनी ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर केले असून १०२०० गिरणी कामगारांनी ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर केली आहेत. गिरणी कामगार/ वारसांनी ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा 

‘कृपया शमीला अटक करु नका’ : दिल्‍ली-मुंबई पोलिसांची भन्‍नाट पोस्ट चर्चेत
सिंधुदुर्ग : देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईला रवाना
Mumbai Fire | मुंबईच्या भायखळामधील इमारतीला आग, ५ जणांना वाचवले

The post म्हाडाकडून १०० गिरणी कामगारांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप appeared first on पुढारी.

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सन २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र १०० गिरणी कामगार आणि वारसांना सातव्या टप्प्यांतर्गत आज (दि.१६) सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. MHADA वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती …

The post म्हाडाकडून १०० गिरणी कामगारांना सदनिकांच्या चाव्यांचे वाटप appeared first on पुढारी.

Go to Source