नितेश गोरल ‘येळ्ळूर क्लासिक’चा मानकरी

नितेश गोरल ‘येळ्ळूर क्लासिक’चा मानकरी

येळ्ळूर गाव मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धा : जोतिबा बिर्जे उत्कृष्ट पोझर
बेळगाव : येळ्ळूर येथे बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना व मेनसे फिटनेश येळ्ळूर यांच्या सयुक्त विद्दमाने आयोजित येळ्ळूर गाव मर्यादीत क्लासिक टॉप 10 शरीर सौष्ठव स्पर्धेत कार्पोरेशन व्यायाम शाळेचा नितेश गोरले येळ्ळूर क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला. जोतिबा बिर्जेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. येळ्ळूर येथे होतकरु तरुण व्यसनाकडे न जाता शरीर सदृढ व निरोगी ठेवण्यासाठी येळ्ळूर येथील मेणसे फिटनेसने या स्पर्धेचे आयोजन केले होते. गाव मर्यादित येळ्ळूर क्लॉसिक टॉप टेन शरीर संस्था स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत सभासद रमेश गोरल, सतीश पाटील, गणेश अष्टेकर, परसराम धामणेकर, ऊपेश पावले, मयूर मेणसे, उमेश सांबरेकर व संजय मेनसे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत जवळपास स्पर्धकांनी भाग घेतला होता.
टॉप टेन निकाल पुढीलप्रमाणे:- 1) नितेश गोरल कार्पोरेशन. 2) जोतिबा बिर्जे कार्पोरेशन, 3) नितेश मजुकर मेनसे फिटनेस, 4) संतोष उंदरे मेनसे, 5) साहिल पाटील मेनसे, 6) आकाश जोगानी मेणसे. 7) चेतन पेडणेकर मेनसे, 8) प्रमोद पाटील मेनसे, 9) संजय बस्तवाडकर मेनेसे.  10) जोतिबा गोरल मेनसे यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदके, प्रमाणपत्र, चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्धण्णवर, एम. गंगाधर, नूर मुल्ला. हेमंत हावळ, बसवराज आरळीमट्टी, सुनील पवार, आकाश  हुलीयार, तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत यांनी काम पाहिले.