नामिबियाचा सामना ओमानशी

नामिबियाचा सामना ओमानशी

वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
टी-20 विश्वचषकातील आज सोमवारी ब्रिजटाऊन येथे होणार असलेल्या ‘ब’ गटातील लढतीत आफ्रिकी पात्रता फेरीत प्रबळ शक्ती ठरलेल्या नामिबियाचा सामना ओमानशी होणार आहे. यावेळी विजयाने सुऊवात करण्याची आशा नामिबिया बाळगून असेल. तथापि, त्यांच्यासाठी हे आव्हान तितके सोपे नसेल. कारण एप्रिलमध्ये झालेली पाच सामन्यांची मालिका नामिबियाने शेवटी 2-1 ने जिंकण्यापूर्वी ओमानने त्यांना जोरदार झुंज दिली होती. टी-20 विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्यांदा खेळणाऱ्या ओमानला त्यामुळे यावेळी अधिक चांगल्या निकालाची अपेक्षा असेल.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वा.