विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून

पणजी : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 या दरम्यान होणार असल्याचे वृत्त आहे. लवकरच त्याची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाळी अधिवेशनाचा कालावधी मोठा असतो. लोकसभा निवडणुकीनंतर होणारे हे पहिले अधिवेशन ठरणार आहे. या अधिवेशनात अनेक दुऊस्ती विधेयके मांडली जाणार असून विविध विषय, प्रश्न समस्या त्यावर चर्चा होणार आहे. सदर अधिवेशनाची तयारी प्रशासनाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.